आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death News In Marathi, Youth Death Of Electric Shock, Divya Marathi

विजेच्या धक्क्याने युवकाचा खांबावरच मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथून जवळच असलेल्या बेलखेड शिवारात अंबिका मातेच्या मंदिरामागे एका खांबावर मजूर युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजता घडली.
बेलखेड येथील सचिन आकाराम बोदडे (28) हा इलेक्ट्रिकचे काम करतो. बेलखेड शिवारात शनिवारी सकाळी 11 वाजता सचिन बोदडे हा वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी खांबावर चढला. या खांबावरून 11 केव्हीच्या विजेची वाहिनी जात असल्याने काम करताना त्याला विजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित वायरमनवर कारवाई करण्याची मागणी केली. सचिन बोदडेच्या अपघाती मृत्यूला वायरमनच जबाबदार आहे, असा आरोप गावकर्‍यांनी केला. कारण वायरमन या युवकाकडून रोजंदारी देऊन खांब्यावरील कामे करीत असल्यामुळे वायरमनवर कारवाई व्हावी, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. सचिन बोदडे याचे 14 दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आत्माराम तुकाराम बोदडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वायरमन खांबावर चढत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर
ग्रामीण भागात अनेक वायरमन विद्युत पुरवठय़ाची कामे स्वत: करीत नाहीत. ही बाब शनिवारच्या घटनेने पुन्हा समोर आली आहे. मजुरी देऊन वायरमन गावातील एखाद्या मजुराला हाताशी धरून त्याला योग्य मोबदला देऊन त्याच्याकडून कामे करून घेतात. यामध्ये जर मजुराचा मृत्यू झाला, तर त्याला बेकायदा ठरवून त्याच्यावरच कारवाई केली जाते, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.