आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२५ महिलांकडून उकळले तीन लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महिलांसाठीशासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभमिळवून देण्याच्या नावाखाली अकोला येथील १२५ महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार पोिलस ठाण्यात करण्यात आली आहे. या महिलांची दोन लाख ९९ हजार रुपयांनी फसवणूक झाली अाहे.
कृषिनगरातील सुनीता अनिल साबळे यांनी सवि्हिल लाइन्स पोिलस ठाण्यात कौलखेड येथील आनंदा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नालंदा प्रकाश चक्रनारायण यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनीता सावळे यांनी तक्रारीत म्हटले की, दोन वर्षांपूर्वी कामािनमित्त सर्वोपचार रुग्णालयामध्ये नालंदा चक्रनारायण यांच्याशी भेट झाली. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरामध्ये आम्हाला काही कागदपत्रांच्या फायली दिसल्या. त्याबाबत विचारणा केली असता, आपली महिलांची संस्था आहे, त्या संस्थेंतर्गत गरजू महिलांना शासनाचे अनुदान, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च, लॅपटॉप, घरबांधणीसाठी एक लाख रुपयांची मदत देण्याचा कार्यक्रम संस्थेतर्फे राबवण्यात येते. आजवर अनेक महिलांना आपण योजनांचा लाभमिळवूनदिला आहे, असे त्यांनी सांिगतले. त्यावर आम्ही शासनाच्या याेजनांच्या लाभासाठी त्यांच्याकडेविनंती केली. त्यावर नालंदा चक्रनारायण यांनी मीटिंगही घेतली होती. या बैठकीत १२५ महिला उपस्थित होत्या. महिलांनी योजनेचा लाभमिळेल यासाठी चक्रनारायण यांनी प्रत्येकी १३०० रुपये जमा करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे महिलांनी पैसे जमा केले. मात्र, योजनांचा लाभ तरमिळाला नाहीच उलट जमा केलेले पैसेहीमिळाले नसल्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाेलिसात तक्रार दिली.
अनेकांना लाभ दिल्याची बतावणी
आपलीमहिलांची संस्था आहे. अनेक महिलांना आजपर्यंत योजनांचा लाभमिळवून दिला आहे. या संस्थेची मुख्य कार्यालय नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आहे आणि मीच संस्थेची अध्यक्ष आहे. असे सांगून इतर महिलांना प्रभावित करण्यात आले होते. त्यावरून अनेक महिला प्रभावित झाल्या आणि त्यांनी पैसे गुंतवले होते.