आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात कार्यरत अभियंते आजपासून ‘नॉटरिचेबल’?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेत जवळपास सर्वच तांत्रिकपदांवर मानसेवी अभियंते गेल्या 13 ते १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. सर्वच विभागातील अभियंत्यांनी हा निर्णय घेतल्याने सहा नोव्हेंबरपासून महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आकृतीबंध मंजूर नव्हता. तसेच अनेक तांत्रिकपदांची आवश्यकता होती. त्यामुळे या पदांवर मानसेवी म्हणून अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. अभियंत्यांबरोबरच इतर िवभागातही अधिकाऱ्याची मानसेवीतत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. मागील १३ ते १४ वर्षापासून या अभियंता, अधिकाऱ्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ दिली जाते. शासनाने महापालिकेचा आकृतीबंधही मंजूर केला आहे.
परंतु अद्यापही या मानसेवी अभियंता, अधिकारी कर्मचाऱ्यांना कायम आस्थापनेवर नियुक्त केलेले नाही. त्यामुळे हे अभियंते, अधिकारी अद्यापही मानसेवी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कायम आस्थापनेवरील अभियंते अधिकाऱ्यांपेक्षा अत्यल्प वेतनावर हे अभियंते कार्यरत आहेत.

अडीच महिन्यांपासून या अभियंते, अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे आदेश संपुष्टात आले आहेत. कामाचे आदेश नसतानाही हे अभियंते, अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, प्रशासन पदाधिकाऱ्यांनी या अभियंत्यांना कामाचे आदेश देण्याबाबत अद्याप साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे किती दिवस विना आदेशाने काम करायचे? असा प्रश्न या अभियंत्यांसमोर आहे.