आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 फूट विहिरीतून काळविटाची सुटका, प्रयत्नांना आले यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरालगतच्या डाबकी परिसरातील श्रीकृष्ण पांडुरंग भिरड यांच्या शेतातील 60 फूट खोल विहिरीत 16 जुलैला सकाळी पडलेल्या काळविटाची दुपारी साडेचारला सुखरूप सुटका करण्यात यश आले.

भिरड यांच्या शेतातील जुन्या विहिरीत सकाळच्या सुमारास काळवीट नर पडला. सकाळी शेत मालक शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी अकोला वन विभागास त्वरित दूरध्वनीने घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी कातखेडे, डी. ए. सुरजुसे, एन. पी. सोनोने, खांडेकर, भूषण जाधव तसेच सर्पमित्र शेख महंमद उर्फ मुन्ना, मोरे, तुषार आवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहीर मोठी व 60 फूट खोल तसेच पाण्याने भरलेली असल्याने काळवीट काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आधी दोर बांधून दोघे विहिरीत उतरले. त्यानंतर काळविटाला ताब्यात घेऊन त्याला दोर बांधण्यात आला. मग दोराच्या साहाय्याने त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. त्याला दोरीतून मुक्त करताच त्याने धूम ठोकली. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.