आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विद्यापीठ उपकेंद्राबाबत निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - अमरावती विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र वाशिम येथे व्हावे, या मागणीसाठी येथील वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे भागवत मापारी यांच्या नेतृत्वात नुकतेच जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.वाशीम जिल्ह्यातील विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापकांना अगदी छोट्या छोट्या कामांकरिता अमरावती विद्यापीठात जावे लागते. यामध्ये वेळेसोबतच पैशाचाही अपव्यय होत आहे.
सन १९९५ रोजी वाशीम येथे उपकेंद्र स्थापन करण्याबाबत ठराव पारीत करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने १०८ एकर जमीन बाभुळगावा शिवारात उपलब्ध करुन दिली होती. परंतु काही नेते हे उपकेंद्र अकोला येथे हलवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे उपकेंद्र वाशीमवासीयांसाठी उपयुक्त ठरणार असल्यामुळे ते त्वरित द्यावे. तसेच, गेल्या १९ वर्षांपासून सुरू असणारा संघर्ष संपुष्टात आणावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यास आंदोलन छेडावे लागेल, संबंधितांनी नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...