आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र विदर्भ राज्य मुद्द्यावर भाजपची दुटप्पी भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विदर्भ राज्यासाठी लढा देणारे माजी आमदार वामनराव चटप यांनी केली आहे. ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी बोलत होते. भाजपचे नेते भाषणात वेगळ्या विदर्भ राज्याला आपले समर्थन असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, विदर्भ स्वतंत्र होण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची लढाई जनतेच्या दरबारात नेण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून विदर्भ गर्जना यात्रा काढणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
नागपूर येथून निघून सिंदखेडराजा येथे ही यात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी सिंदखेडराजा येथून समोर ही यात्रा विदर्भात फिरणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुक्कामी राहणार आहे. २६ तारखेला दारव्हा, दिग्रस, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा सभा होणार आहे. दिनांक २७ ला वणी येथे सभा केल्यानंतर यात्रा वरोराकडे निघणार असल्याची माहिती चटप यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेला बाळासाहेब निवल, अजय चमेडिया, अरुण केदार, दत्ता चांदुरे, अरविंद भोसले, देवेंद्र राऊत उपस्थित होते.