आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Food And Drug Administration, Latest News In Divya Marathi

शहरात दोन लाख 27 हजारांचा गुटखा जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-बुरड गल्लीत असलेल्या र्शी गणेश गॅरेजमध्ये गुटख्याचा साठा आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून दोन लाख 27 हजार 161 रुपयांचा गुटखा जप्त केला. अमरावती, नागपूर आणि मुंबईच्या पथकाने संयुक्तपणे शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
अकोल्यातून बुलडाणा जिल्हय़ात गुटखा पुरवला जातो, अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्याची खातरजमा केल्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजता बुरड गल्लीमध्ये असलेल्या चंद्रनारायण लालचंद अग्रवाल यांच्या र्शी गणेश गॅरेजमध्ये छापा टाकला. या वेळी तंबाखूमिर्शित 36 प्रकारचे गुटख्याचे प्रकार, सुगंधी तंबाखू असे गुटख्याचे पाकीट पांढर्‍या-पिवळय़ा पोत्यांमध्ये असल्याचे आढळून आले. हा गुटखा बुलडाणा जिल्हय़ातील देऊळगावराजा येथे जात होता. अन्न सुरक्षा अधिकारी, दक्षता अधिकारी (मुख्यालय मुंबई) आर.ए. समुद्रे, अन्न सुरक्षा दक्षता अधिकारी (अमरावती) एन.पी. सोयम, एस.बी. घुले (नागपूर), अन्न सुरक्षा अधिकारी (अकोला) नीलेश ताथोड यांनी ही कारवाई केली.