आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्त दयानंद चिंचोलीकरांची मुंबई मेट्रो विभागात बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे आपल्या कामाचा ठसा उमटवणारे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची अखेर मुंबई मेट्रो विभागात बदली झाली. त्यांची बदली झाल्याचा फॅक्स १७ एप्रिलला महापालिकेत धडकला. त्यामुळे आता नवे उपायुक्त कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उपायुक्त चिंचोलीकर महापालिकेत जुलै २०१४ ला रुजू झाले होते. लेखा विभागात कार्यरत दयानंद चिंचोलीकर यांनी पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केले. त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या कार्यशैलीमुळे ते शहरात लोकप्रियही झाले होते, तर अनेकांची अतिक्रमणे काढल्याने काहींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तपदी असलेले महेंद्र कल्याणकर यांची बदली झाल्यानंतर त्यांनी काही दिवस रजा काढली होती. काढलेली रजा संपल्यानंतर त्यांनी आजारी रजा घेतली होती. यादरम्यान त्यांची बदली होणार, अशी चर्चा सातत्याने सुरू होती. परंतु, १७ एप्रिलला त्यांच्या बदलीचा फॅक्स महापालिकेत धडकला. त्यांची मुंबई मेट्रो येथे प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे आता उपायुक्तांची दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...