आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये लाखोंचा गुटखा पकडला,मोठ्या रॅकेटचा सुगावा लागण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- न्यू राधाकिसन प्लॉट येथील एका पान-सुपारी विक्रेत्याकडे गुटखा वितरित करणाऱ्या ऑटोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अँटी गुंडा स्कॉडच्या पथकाला मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला. या कारवाईत अँटी गुंडा स्कॉडने जवळपास 15 लाखांचा गुटखा जप्त केला.
पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यासाठी आणि शहर पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये शहराकरिता अँटी गुंडा स्कॉड कार्यरत आहेत. मात्र, यापैकी शहरातील अँटी गुंडा स्कॉडवर झालेल्या आरोपामुळे जिल्हा पोिलस अधीक्षकांनी तत्काळ अँटी गुंडा स्कॉड पथक बरखास्त केले होते. या स्कॉड पथकाच्या बरखास्तीनंतर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी कारवाई केली. पथकाला गुटख्याचे वितरण होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने न्यू राधाकिसन प्लॉटकडे जाणाऱ्या एमएच ३० ९१३७ क्रमांकाच्या मालवाहू ऑटोचा पाठलाग केला. दरम्यान, हा ऑटो परिसरातील रमनकुंज अपार्टमेंटजवळ थांबला असता पथकाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऑटोचालकाला पकडले. ऑटोचालक हा अपार्टमेंटमधील रहिवासी हरीश केशवलाल सांगाणी यांचा माल पोहोचवण्यासाठी जात असल्याचे चौकशीदरम्यान पथकाला समजले. त्यानंतर पथकाने सापळा रचून हरीश सांगाणी यांना रंगेहात पकडले. या मालासोबतच काही जुन्या मालाची साठवणूकदेखील सांगाणी यांच्याकडे आढळली. जुना माल जवळपास लाखांपर्यंत अाहे. याबाबत ऑटोचालकाची अधिक चौकशी केल्यावर मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला. यानंतर पथक ताबडतोब फतेह चौकातील काश्मीर लॉजकडे रवाना झाले. येथून काश्मीर लॉजच्या तळघरात असलेल्या गोडाउनमध्ये गुटख्याने भरलेले २६ पोते जप्त केले. जप्त करण्यात आलेला माल हा बैदपुरा रहिवासी वाहीद खान जहांगीर खान याचा असल्याचे समजले. याव्यतिरिक्त वाहीद खान जहांगीर खान त्याचे सहकारी खदान परिसरातील रहिवासी कल्लू, आशीष अग्रवाल घनश्याम यांच्या औद्योगिक वसाहतीमधील गोडाउनवर छापा टाकला. या ठिकाणी अंदाजे १० ते १५ लाखांपर्यंतचा गुटखा जप्त करण्यात आला. दरम्यान, यातील आरोपी वाहीद खान जहांगीर खान, कल्लू, आशीष अग्रवाल घनश्याम हे मुख्य चार आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.