आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध म्हणजे संविधानास नकार, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीय संविधानाच्या परिच्छेद ४८ मध्ये असे नमूद करण्यात आले की, राज्य शासनाने राज्यातील गोवंशाचे रक्षण करावे, त्यासाठी कायद्याची निर्मिती करावी. त्यानुसार गोवंश हत्याबंदी कायद्यास विरोध करणे म्हणजेच संविधानास नाकारण्यासारखे आहे. गोसेवा, गोरक्षण जीवनाचा अविभाज्य घटक असून, पर्यायाने पर्यावरण आपल्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
आदर्श गोसेवा प्रकल्प अनुसंधान केंद्र म्हैसपूर तथा विदर्भातील गोशाळा, गोसेवकांच्या वतीने आज, जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राज्य शासनाने संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आणल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास व्यासपीठावर आदर्श गोसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष रतनलाल खंडेलवाल, उपाध्यक्ष सुभाष जैन, कीर्तनकार संजय महाराज पाचपोर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गोमातेच्या मूर्तीचे पूजन झाले. अध्यक्ष रतनलाल खंडेलवाल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. संजय महाराज पाचपोर यांनी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, गोमातेची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तद्नंतर विदर्भातून आलेल्या विविध गोशाळांचे संचालक, पदाधिकारी, गोसेवकांच्या वतीने भव्य गुलाबपुष्पाच्या हाराने सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पप्पूजी डागा, विजय शर्मा, सुनील सूर्यवंशी, सुनील मानसिंगा, डॉ. सराफ, मधुसूदन अग्रवाल, रमेश चांडक, मयूर शहा, तुलसीदास गोयनका, विनोद लोहिया, विजय तोष्णीवाल आदींचा समावेश होता.
जगभरात भारतीय सोयाबीनला मागणी आहे, या बियाण्यांवर संशोधन व्हावे, मात्र ते कशासाठी? याचा विचार महत्त्वाचा आहे. बीटी बियाणे आल्यानंतर आधी उत्पादन मग कीटक, नंतर लागवडीचा खर्च वाढला. पूर्वी गावातील कचरा शेतात खताचे काम करायचा. मात्र, आता त्यातही प्लास्टिक आले आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. सूत्रसंचालन विवेक बिडवई यांनी केले. अॅड. मोतीसिंह मोहता यांनी आभार मानले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कर्जासाठी अडवणूक करू नका...तरच थांबतील आत्महत्या...मागेल त्याला वीज...