आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadnvis Speaking At Alola Rally, Divya Marathi

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दलालांची फौज- भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेतकरी राबतात. पण, शेतमालाला भाव मिळत नाही. कारण, काँग्रेस व राष्ट्रवादीने दलालांची फौज ठेवल्याने शेतकर्‍यांच्या पदरी काही पडत नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. येथील क्रिकेट क्लब मैदानावर भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, राज्य सरकारने केवळ आश्वासने दिली. गत काळात झालेल्या नैसर्गिक आपत्तीची मदत देताना सरकारने शेतकर्‍यांची थट्टा केली. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असून, देशात परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फुंडकर विरोधी पक्षनेते?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून सध्या विनोद तावडे कार्यरत आहे. पण, आज सभेच्या ठिकाणी झालेली विविध नेत्यांची भाषणे आणि गर्दी पाहून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार झालेल्या पांडुरंग फुडकर यांना नव्याने पुन्हा विरोधी पक्षनेते पदावर बसवल्याने मोठी चर्चा पक्ष पातळीवर होती, तर चैनसुख संचेती यांना एका वक्त्याने प्रदेशाध्यक्ष संबोधले.

पोलिसांचा अतिरेक
पोलिस दलातील कार्यरत कर्मचार्‍यांनी नागरिकांना सभेच्या ठिकाणी जाताना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे सभेसाठी उन्हात ताटकळत बसलेल्या नागरिकांना पाण्याअभावी राहावे लागले. दुसरीकडे पोलिस कर्मचारी पाण्याच्या बॉटलची ने-आण करत सहकार्‍यांना पाणी देत होते.

या ठिकाणी आलेल्या लहान मुलांना पाण्यासाठी गर्दीतून वाट काढताना त्रास सहन करावा लागला. सभेच्या ठिकाणी पाण्याची सोय केलेली होती. पण, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल सुरक्षेच्या नावाखाली आत सोडल्या नाहीत. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. पोलिसांची ही भूमिका मानवतेला धरून नव्हती, अशी चर्चा सभा स्थळी होती.

स्टेज नंबर दो
व्यवस्थेच्या कारणावरून दोन स्टेज उभारले होते. मुख्य स्टेजवर ज्या व्यक्तींना समाविष्ट करता आले नाही त्यांची व्यवस्था केली होती. यामध्ये लखन मलिक, संजय कुटे, सुरेश लुंगे, हरीश आलिमचंदानी, जगन्नाथ ढोणे, पुरुषोत्तम कंवर, गजानन कांबळे, तरुण बगेरे, राजेश मिर्शा, नरेंद्र गोलेच्छा, गोपाल खंडेलवाल, भारती गावंडे, आरती लढ्ढा, चाँद खॉ, लता गावंडे आदींची उपस्थिती होती.

मुख्य स्टेजवर यांची उपस्थिती
चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील, हरिभाऊ जावळे, तेजराव थोरात, विजय जाधव, डी. गोपनारायण, हरीश पिंपळे, राजेंद्र फडके, संजय गावंडे, गुलाबराव गावंडे, रवींद्र भुसारी, अशोक ओळंबे, विजय अग्रवाल, दीपक माळी, रणधीर सावरकर