आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्लेवार हल्ला; 8 आरोपी अटक, दोन अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उमरी येथील धनंजय बिल्लेवार याच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात बिल्लेवार याच्या दोन्ही हातांचे पंजे तोडण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना शनिवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा आरोपींची १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली, तर दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
धनंजय िबल्लेवार याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सतीश रघुनाथ वानखडे, अाकाश अशोक वानखडे, जय रामा तायडे, संजय रामदास रामटेके, सुरेंद्र अशोक नाईक, सचिन जयराम वाघमारे यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० जूनपर्यंत पोलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उमरी येथे राहत असलेला धनंजय बिल्लेवार याची उमरी येथे आत्या राहते. आत्याच्या मुलासोबत धनंजयच्या बहिणीचे लग्न ठरले होते. बुधवारी आत्याकडे नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रमासाठी आहेर घेऊन गेला होता.
कार्यक्रम आटोपून तो घरी निघाला असताना हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्याच्यावर अचानक तलवारीने आणि धारदार शस्त्राने वार केले. या वेळी हल्लेखोरांनी त्याच्या दोन्ही हातांना लक्ष्य केले. त्यात त्याचे दोन्ही हात तुटले. हाताचे बोटंसुद्धा तुटून पडली होती. धनंजय िबल्लेवार हा नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी आहे.
बिल्लेवार होता आरोपी
नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांचा एक हात निकामी झाला. त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेल्या आरोपीमध्ये धनंजय बिल्लेवारचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी तो जामीनवर सुटला होता.