अकोला - शंकराचार्य व जांबुवंतराव धोटे यांचेसारखे लोक समाजात द्वेष पसरवणारे असून ते स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी उलटसुलट बोलतात. धोटे यांनी गजानन महाराज व इतर महापुरूषांबद्दल केलेले वक्तव्य प्रसिद्धीसाठीच आहे.
साधू-संतांची कुठलीही जात नसते, अशा शब्दांत निषेध व्यक्त करत बसस्थानक चौकात समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज मंदिर हरिहरपेठच्या भक्तांनी सकाळी 11 वाजता धोटे यांचा पुतळा जाळला. या वेळी मुरलीधर सटाले, डॉ. मकरंद पाटोळे, अनिल पवार, दिनेशसिंग सावते, राजुभाऊ पटेकर, दिनेश देव, अतुल गोगटे, रवी राऊत, अरविंद सिरसाट, गीतेश सोने, आकाश हिरोळे, राम तिवारी, अनिल शिंदे, विनोद पवार, रणजित चव्हाण, छत्रपती पाटोळे, विनोद नवले, प्रकाश शिंदे, विनोद पवार, आकाश सावते, प्रेमसिंह गोैर आदी भक्त उपस्थित होते. सह्याद्री संस्थेच्या वतीनेही निषेध करण्यात आला.