आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Diesel, Petrol, Against Growth Rate,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मोदी सरकार आयी, महंगाई लायी’,महागाईविरोधात काँग्रेसचे ‘गाडी ढकलो’ आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसने रविवारी, 6 जुलै रोजी ‘गाडी ढकलो’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ‘मोदी सरकार आयी, महंगाई लायी’, असा नारा देत त्यांनी केंद्र शासनाचा निषेध केला तसेच सकाळी 11 वाजता दुचाकी गाड्या ढकलत फेरी काढली.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मदन भरगड यांच्या नेतृत्वात या आंदोलनास चित्रा चौकातील काँग्रेस च्या कार्यालयापासून प्रारंभ झाला. धिंग्रा चौक मार्गे स्वराज्य भवनात पोहोचले. सभेने आंदोलनाचा समारोप झाला.
आंदोलनात अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत दुचाकी ठेवून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला, तर त्यामागे सर्व पदाधिकारी दुचाकी ढकलत नारेबाजी करीत होते. स्वराज्य भवनात मदन भरगड म्हणाले, की मोदींच्या खोट्या आश्वासनांमुळे जनता अल्पावधीतच कंटाळली असून, महागाईने उच्चांक गाठला आहे. ही भाववाढ कमी झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही दिला. आंदोलनात अजहर हुसेन, बबनराव चौधरी, विष्णू मेहरे, अल्लू पहिलवान, भारत सत्याल, गणेश कटारे, मनोज पाटील, रमेश मोहोकार, मब्बाभाई, प्रदीप वखारिया, डॉ. सुभाष कोरपे, डॉ. सुधीर ढोणे, अफरोज लोधी, राजेश पाटील, हरीश कटारिया, राजू बगथरीया, सचिन गिरी, संजय देशमुख, स्वाती देशमुख, सीमा ठाकरे आदी सहभागी झाले होते.
जिल्हा काँग्रेसनेही केला महागाईचा निषेध
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे राज्यात महागाईविरोधी पुकारलेल्या जनआंदोलनाचा भाग म्हणून जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनेही टॉवर चौक ते स्वराज्य भवनदरम्यान दुचाकी ढकलत पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. या वेळी नरेंद्र मोदी शासनाविरुद्ध नारेबाजीही करण्यात आली. बैलगाडीत दुचाकी ठेवून पदाधिकारी, कार्यकर्ते मागे दुचाकी ढकलत सहभागी झाले. यामध्ये महासचिव राजेश भारती, उपमहापौर रफिक सिद्दीकी, दिलीप देशमुख, उषा विरक, फय्याज खान, अफसर कुरेशी, महिलाध्यक्षा रूपाली ढेरे, महेश गणगणे, डॉ. झिशान हुसेन, अंशुमन देशमुख आदी सहभागी झाले होते.