आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएममधून फाटकी, विचित्र आकाराची नोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवणी-शिवर परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून एसबीआयच्याच ग्राहकाला 100 रुपयांची फाटकी व विचित्र आकाराची नोट मिळाली. ही नोट बदलण्यासाठी या ग्राहकाला हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

शिवणी-शिवर भागात रामकृष्ण सोनटक्के यांचे गजानन बूट हाऊस नावाचे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे. एसबीआयच्या शिवणी शाखेत त्यांचे करंट खाते आहे. 24 जूनला दुपारी 12.04 वाजता त्यांनी शिवणी-शिवर परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून 500 रुपये काढले. त्यात ओडीई-693422 या क्रमाकांची 100 रुपयांची नोट फाटकी व विचित्र आकाराची मिळाली. ही नोट बदलण्यासाठी त्यांनी बँकेची शिवणी ब्रँच गाठली. मात्र, बँकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना नोट बदलण्यासाठी मुख्य शाखेचा मार्ग दाखवला. रामकृष्ण सोनटक्के मुख्य शाखेत गेल्यानंतर तेथील अधिकार्‍यांनी त्यांना शिवणी शाखेचा मार्ग दाखवला. यामुळे रामकृष्ण सोनटक्के या मजुरी करणार्‍या ग्राहकाला 100 रुपयांसाठी हेलपाटे घ्यावे लागले.
नोट बदलून दिली जाईल
४एखाद्या वेळी असा प्रकार घडतो. मात्र, एटीएममधून विड्रॉल करताना मिळालेली स्लिप दाखवल्यानंतर नोट बदलून दिली जाईल.
- एस. टी. बोर्डे, मॅनेजर, एसबीआय मुख्य शाखा अकोला