आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Director Aditya Raut,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कबड्डीत "नोएल' अजिंक्य, कर्णधार आदित्य राऊतच्या धडाकेबाज खेळीने मिळवले यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- संघाचाकर्णधार धडाकेबाज रेडर आदित्य राऊतच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर नोएल कॉन्व्हेंटने सतत सहाव्या वर्षीही जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सतत सहाव्या वर्षीही अजिंक्यपद पटकावल्याने नोएलच्या संघाचे कौतुक होत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने आज, सप्टेंबरला जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन झाले. १७ वर्षांआतील वयोगटात मुलांमध्ये एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. मात्र, पावसामुळे उपांत्य अंतिम लढती राहिल्या होत्या. त्या लढती आज खेळवण्यात आल्या. यामध्ये पहिल्या उपांत्य लढतीत डी. आर. पाटील विरुद्ध जागृती िवद्यालयात सामना रंगला. यामध्ये डी. आर. पाटील महाविद्यालयाच्या संघाने ११ गुणांनी विजय मिळवला. तर, दुसऱ्या उपांत्य लढतीत नोएल कॉन्व्हेंट विरुद्ध प्राजक्ता विद्यालयात सामना झाला. यामध्ये नोएल कॉन्व्हेंटने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत १४ गुण फरकाने प्राजक्ता विद्यालयाचा पराभव केला. अंतिम लढत नोएल कॉन्व्हेंट विरुद्ध डी. आर. पाटील महाविद्यालयात रंगली. अंतिम लढतीत नोएलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून दबदबा बनवला. पूर्वार्धात मोठी बढत घेऊन विजय निश्चित केला. संघाचा कर्णधार आदित्य राऊतने उत्तम रेड करत गुणांची बरसात केली. अंतिम लढत नोएल कॉन्व्हेंटने १८ विरुद्ध ५० अशा ३२ गुणफरकाने विजय मिळवला. मागील पाच वर्षांपासून नोएलचा संघ जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावत आहे. नोएलच्या संघाकडून आदित्य राऊतसोबतच पराग शेंडे, शुभम पाटील, हर्षवर्धन इंगळे, शुभम इंगळे, आदित्य क्षीरसागर यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. तर, १९ वर्षांआतील मुलींच्या गटात दोनच संघ असल्याने थेट अंतिम लढत घेण्यात आली. यामध्ये मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत प्राजक्ता विद्यालयाच्या संघावर मात करत विजेतेपद पटकावले. मोहरीदेवी खंडेलवाल संघाने ५४ गुण, तर प्राजक्ताविद्यालयाने गुण मिळवले. मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाने तब्बल ५० गुणफरकाने विजेतेपद पटकावले.
यांनी घेतला पुढाकार
स्पर्धेचेसंयोजक म्हणून क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी काम पाहिले. पंच म्हणून रामभाऊ अहीर, गजानन इंगळे, संजय मैंद, राहुल शेगावकर, राजेंद्र जळमकर यांनी काम पाहिले. तर, स्पर्धेसाठी विविध शाळांच्या क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.