आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Director Of Coaching Class And Business Disputes Police Stesana

कोचिंग क्लास संचालक आणि व्यापार्‍यांमधील वाद पोलिस ठाण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-रणपिसेनगरातील जनरल र्मचंट डिस्ट्रिब्युटर मार्केटमध्ये (जी.एम.डी.) कोचिंग क्लास संचालक आणि व्यावसायिक यांच्यात धुमसत असलेला वाद सोमवारी, 3 फेब्रुवारीला पोलिस ठाण्यात पोहोचला. काही जणांच्या मध्यस्थीमुळे दोघांमध्ये समेटही झाला होता. मात्र, नंतर कोचिंग क्लास संचालकाने राजकीय वजन वापरल्याने व्यापार्‍यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
जीएमडी मार्केट ही कोचिंग क्लास घेण्याची जागा नाही. या मार्केटमध्ये 123 दुकाने असल्यामुळे येथे खरेदीसाठी येणार्‍यांना कुटे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या वाहनांच्या पार्किंगचा त्रास होतो. यावरून जीएमडी व्यवस्थापनाने काही महिन्यांपूर्वी येथील कोचिंग क्लासेस संचालकांना क्लासेस हलवण्यास सांगितले होते. त्यातील काही कोचिंग क्लास येथून हलवण्यात आले. मात्र, प्रा. संतोष कुटे यांनी त्यांचा कोचिंग क्लास येथून हलवण्यास टाळाटाळ के ली. त्यामुळे या क्लासेसचे संचालक प्रा. संतोष कुटे आणि व्यापारी यांच्यातील वाद दिवसेंदिवस धुमसत होता. त्यातच आज सोमवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान कोचिंग क्लासमधील एका विद्यार्थ्याने इमारतीमधील प्रसाधनगृहाच्या दारावरच लघुशंका केली. एका व्यापार्‍याने हटकले असता, तो असभ्य शब्दात बोलला. त्यानंतर त्याच्या मदतीला शिक्षक प्रा. संतोष कु टे धावून आले. त्यांनी विद्यार्थ्याला समजावण्याऐवजी व्यापार्‍यांचाच अर्वाच्च भाषेत पाणउतारा केला. यावरून व्यापारी आणि संचालक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद सिव्हिल लाइन्स ठाण्यात पोहोचला. व्यापार्‍यांनी क्लासेसच्या संचालकाविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे मत बनवले. पण, ठाणेदार प्रकाश सावकार यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, या संचालकांनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. या वेळी मनोहर पाटील यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून जीएमडीचे अध्यक्ष जयनेंद्र लुक्कड यांनी पोलिसात प्रा. संतोष कुटे यांच्याविरोधात तक्रार दिली. मात्र, प्रा. संतोष कुटे यांनी त्यांच्याविरोधातील तक्रार व्यापार्‍यांनी मागे घेतल्याचा दावा एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
तक्रार मागे घेतली
कोठारी, श्री. लुक्कड यांचा विद्यार्थ्यांसोबत प्रसाधनगृहाचा किरकोळ वाद सुरू असताना मी मध्यस्ती करण्यासाठी गेलो. त्यामुळे पोलिस ठाण्यात माझ्याविरुद्ध तक्रार दिली. ही तक्रार किरकोळ स्वरूपाची असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे, मनोहर दांदळे पाटील, अरविंद घोगरे यांनी मध्यस्ती करत तक्रारकर्त्यांचे गैरसमज दूर करून दोघांच्या सहमतीने तोंडी तक्रार मागे घेण्यात आली.’’ प्रा. संतोष कुटे
प्रा. कुटे राजकीय दबाव आणत आहेत
ही जागा व्यापारी संकुलाची आहे. येथे क्लासेस चालवता येत नाही. येथे एक हजार मुले रोज येतात. त्यांचा आणि त्यांच्या वाहनांचा प्रचंड त्रास होतो. येथे अनुचित प्रकारही घडतात. तक्रार मागे घेण्यासाठी कुटे कोचिंग क्लासेसचे संचालक आमच्यावर राजकीय दबाव आणत आहेत. क्लासेस बंद होतील, त्यावेळी तक्रार मागे घेऊ. कुटेंसोबत आमचे दुसरे काहीही वैर नाही.’’ जयनेंद्र लुक्कड, अध्यक्ष जी.एम.डी. अकोला