आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात अस्वच्छता करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे; कारवाईचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका आरोग्य निरीक्षकांनी वारंवार अस्वच्छता करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या सूचनांनुसार राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात अस्वच्छता करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. शहरातदेखील स्वच्छतेच्या दृष्टीने संबंधिताना नोटीस बजावून वारंवार अस्वच्छता करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नियमानुसार दाखल करण्याची कारवाई संबंधित आरोग्य निरीक्षकांनी करावे, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार ही कारवाई होते किंवा नाही, याकडे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने व आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी राजेंद्र घनबहादूर यांनी लक्ष द्यावे व शहर स्वच्छ राखावे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.