आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुद्ध पाण्यामुळे धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अशुध्द पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अकोला, मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये तापाची साथ आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करुन वैद्यकीय यंत्रणा रुग्णांच्या आयुष्यासोबत खेळत आहे.

जलजन्य आजाराचा प्रतिबंध व उपचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रामीण भागातील आरोग्य व पंचायत विभागाच्या कर्मचार्‍यांना करावे लागते. मात्र, आपल्या जबाबदारीचा विसर या स्थानिक कर्मचार्‍यांना पडलेला दिसून येत आहे. पावसाळ्याचे दिवस असूनसुद्धा आजही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरची उपलब्धता झालेली नाही. याशिवाय पूर्णेकाठच्या प्रकल्पातून होत असलेल्या नळ योजनेच्या माध्यमातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. हा प्रकार गेल्या मार्च महिन्यापासून सुरू आहे. तरीसुद्धा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा प्रकार थांबवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच योग्य त्या उपाययोजनांसह ग्रामीण भागात आजाराची साथ लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने जनजागरण अभियान राबवणे गरजेचे झाले आहे.

नागरिक वैतागले
अकोला तालुक्यातील एकलारा, कट्यार, वडद, दोनवाडा या गावांमध्ये तापीची साथ सुरू असून, गावात आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. नागरिक डोकेदुखी, अंगदुखी, अ‍ॅलर्जी, थकवा, अस्थिव्यंगाने त्रासून गेले आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात थातूरमातूर औषध देऊन रुग्णांना परत पाठवण्यात येते. त्यामुळे घरातील एक व्यक्ती आजारी पडला की, संपूर्ण कुटुंबच आजारी पडत असल्याचे वास्तव आहे. कट्यारसाठी म्हैसांग उपकेंद्र, दोनवाडासाठी म्हातोडी उपकेंद्र व या सगळ्यासाठी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा कार्यान्वित आहे. या ठिकाणी डॉ. अशोक देशमुख यांच्यासह कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तेसुद्धा अपडाउन करत असल्याने लाल-पिवळ्या गोळ्या देऊन रुग्णांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करतात. अकोला तालुक्यातील एकलारा, कट्यार, वडद, दोनवाडा या गावांमध्ये तापीची साथ सुरू असून, गावात आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. नागरिक डोकेदुखी, अंगदुखी, अ‍ॅलर्जी, थकवा, अस्थिव्यंगाने त्रासून गेले आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात थातूरमातूर औषध देऊन रुग्णांना परत पाठवण्यात येते. त्यामुळे घरातील एक व्यक्ती आजारी पडला की, संपूर्ण कुटुंबच आजारी पडत असल्याचे वास्तव आहे. कट्यारसाठी म्हैसांग उपकेंद्र, दोनवाडासाठी म्हातोडी उपकेंद्र व या सगळ्यासाठी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा कार्यान्वित आहे. या ठिकाणी डॉ. अशोक देशमुख यांच्यासह कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तेसुद्धा अपडाउन करत असल्याने लाल-पिवळ्या गोळ्या देऊन रुग्णांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करतात.
साथ लक्षात घेता जनजागरण अभियान हवे
नेमके काय झाले आहे : गॅस्ट्रो, एन्टरायटिस, कॉलरा, अतिसार, हगवण आदी जलजन्य आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे कारण दूषित पाणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी शुद्धीकरण न करता गावांमध्ये पाणी येत आहे. ज्या ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची काळजी घेतली जाते, तेथूनच नळगळती, नळाचे कनेक्शन्स सांडपाण्यातून पुढे नेण्यात आले आहेत. याशिवाय गावांमध्ये स्वच्छतेचा विसरच ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे.
तेल्हारा तालुक्यातही लागण :
तेल्हारा तालुक्यातील अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गावांमध्ये रुग्ण वाढले आहेत. पाथर्डी, अडगाव, मुंडगाव, रोहणखेड या गावांमध्ये सर्दी, ताप, खोकला व खाजीचे रुग्ण वाढले असून, औषधोपचाराअभावी त्यांना खासगी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे.
पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह :
गॅस्ट्रो, कॉलरा, हगवण इत्यादी जलजन्य आजाराची साथ लक्षात घेता पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारणे महत्त्वाचे होते. मात्र, निर्जलीकरणावर अद्यापही पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने भर दिला नाही.
जबाबदारीचा विसर :
ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जलसुरक्षकांनी आपल्या गावात दूषित पाणी तर पिण्यात येत नाही ना, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, या कर्मचार्‍यांना कर्तव्याचा विसर पडला आहे.
घरच्या घरी हे करा

निर्जलीकरण प्रतिबंधक घरगुती उपाय म्हणून घरी उपलब्ध असलेले पेय रुग्णाला देण्यात यावे. जसे की, ताक, नारळाचे पाणी, भाताची पेज द्यावी व मातांनी अंगावर पिणार्‍या बालकांचे स्तनपान चालू ठेवावे.’’
डॉ. राजेश तायडे, (फिजिशियन)
तापाच्या रुग्णावर उपचार सुरू
४आपातापा आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमधील नागरिक उपचारासाठी येत आहेत. रुग्ण व्हायरल फीव्हरचे आहेत.’’
डॉ. अशोक देशमुख, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, आपातापा.
औषधी साठा नाही
गावात सर्दी, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात पुरेसा औषधी साठा नसल्याने गरीब रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे.’’
लीलाबाई ठाकरे, सरपंच, कट्यार.