आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाणी; प्रशासनाचे दुर्लक्ष, जिल्ह्यातील २१७ गावांतील लाखो नागरिकांच्या जीवाला धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला,अकोट मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन सभेत सोमवारी स्पष्ट केले. दूषित पाणी थांबवण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अपयशी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हा परिषदेत सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी जलव्यवस्थापन समिती सभा पार पडली. अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, कृषी पशुसंवर्धन सभापती रामदास मालवे, महिला बालविकास समिती सभापती द्रौपदाबाई वाहोकार, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव यांच्यासह जलव्यवस्थापन समिती सदस्य गोपाल कोल्हे, गजानन गावंडे, राजेंद्र खोने यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत कोल्हे यांनी पाणीटंचाई दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित करत गांभीर्य स्पष्ट केले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची जाणीव सभागृहासमोर मांडली. कारखान्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असल्याचे त्यांनी सांगितले.

बाहेरील पाणी बंद करा : वाणप्रकल्पातून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. तो बंद केल्यास अकोट तेल्हारा तालुक्यातील गावांना पाणी आरक्षित ठेवल्या जाऊ शकते, असे गोपाल कोल्हे यांनी सांिगतले.
बैठकीची अॅलर्जी
जल व्यवस्थापनच्या गेल्या दोन बैठकांपासून पाटबंधारे विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याचे कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी सांगितले. याशिवाय अद्याप गटविकास अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाब विचारला, तर त्याचे कोणतेही उत्तर पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याची व्यथाही त्यांनी मांडली. या प्रकरणी गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करा
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती केल्यास पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकतो. गाजीपूर टाकळी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावर दृष्टिक्षेप टाकत जिल्हा परिषद सदस्य गजानन गावंडे यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यावर भर दिला. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभीयंता राजगुरू यांनी बंधारा दुरुस्तीस सुरुवात होण्याचे सांगितले.
अनेक शाळांमध्ये नाही पाणी शौचालये
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आजही पिण्याचे पाणी नाही. तसेच शौचालये नाही. यामुळे िवद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गोरेगाव जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यािठकाणी बोअरवेल मिळण्यासाठी पाठपुरावा केला, तर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र खोने यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम हे नमुना मध्ये राहणाऱ्या व्यक्तींनासुद्धा उपलब्ध करून द्यावे, असा मुद्दा उपस्थित केला.
"दिव्य मराठी'ने कोल्हापुरी बंधाऱ्याला येतील काय अच्छे दिन, जिल्ह्यातील तीनशेहून अधिक गावांत दूषित पाणी मोजक्याच पाण्याने कशी भागेल तहान, या तिन्ही बातम्यांवर सदस्य गोपाल कोल्हे, गजानन गावंडे यांनी प्रकाश टाकून गांभीर्य लक्षात आणून दिले.
८८ खेड्यांतील पाण्याचा प्रश्न कायमच!
अकोट८४ खेडी योजना १६ नोव्हंेबरपासून बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिला होता. मात्र, आमदार सावरकर आमदार भारसाकळे यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी वार्तालाप केल्यानंतर तूर्तास या प्रकरणाला थांबा मिळाला असला, तरी ही योजना सुरू ठेवण्यासाठी प्राधिकरणने महिन्याला १५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
हा खर्च देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे फंड नाही. त्यामुळे निधी उपलब्धतेबाबत १९ नोव्हेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बिनशर्त सुरू राहील, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाणी जरी बंद झाले नसले तरी पाण्याचा प्रश्न मात्र, अद्याप सुटलेला नाही.