आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे १४१ नमुने दूषित ; गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - योग्य गुणवत्तेचे पाणी शाश्वत आणि चिरकाल टिकावे, या दृष्टिकोनातून केंद्र राज्य शासनाच्या धोरणानुसार पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी पाणी नमुन्यांची तपासणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सरसावले आहे.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या रासायनिक पाणी नमुने तपासणी मोहिमेंतर्गत पाणी स्रोतांपैकी जवळपास २७०० नमुन्यांची तपासणी जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षांतर्गत करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी तब्बल ७८ टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटचे आयर्नचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ग्राम पातळीवर आरोग्य सेवकांनी केलेल्या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीची साथरोग विभागामार्फत पुन्हा खातरजमा केली असता जिल्ह्यातील ९०८ नमुन्यांपैकी १४१ नमुने प्राधान्याने दूषित आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने सध्या ग्राम पातळीवर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नायट्रेटचे प्रमाण पाण्यात अधिक असल्यास मिथॅनोग्लोबिनोमिया या आजाराची शक्यता सर्वाधिक बळावते. या आजारामध्ये शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षयसारखा आजार होण्याची संभावना असते. परिणामस्वरूप जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी गुणवत्ता दर्जेदार स्वरूपात मिळावे, यासाठी सध्या जिल्ह्यात पाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नायट्रेटमुळे रक्तक्षयचा धोका : जिल्ह्यातीलपिण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो.
मिथॅनोग्लोबिनोमियासारखा आजार यामध्ये होऊ शकतो. प्रसंगी हे प्रमाण कमी जास्त झाल्यास ब्ल्यू बेबी नावाचा आजार होण्याची शक्यता असते. पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण लीटरला ४५ मिली ग्रॅमपर्यंत अभिप्रेत आहे. मात्र, ते जवळपास ७८ टक्क्यांच्या आसपास जात आहे.

बुलडाणा ७८ १०
चिखली ५८ १५
दे. राजा ३७ ०९
सिं.राजा ३४ ०१
लोणार ४७ ०६
मेहकर १२३ १०
खामगाव ८२ १०
शेगाव ६० ०१
संग्रामपूर ६८ २०
ज. जामोद ६१ १८
नांदुरा ८७ ०४
मलकापूर ७० ०३
मोताळा १०३ ३४
एकूण ९०८ १४१
दोन प्रकारे होते तपासणी
पाण्याची अनुजैविक आणि रासायनिक अशा दोन प्रकारे तपासणी केली जाते. अनुजैविक नमुने दूषित आढळल्यास अशा पाण्यापासून कावीळ, डायरिया, टायफाइडसारखे आजार उद््भवण्याची भीती असते. रासायनिक नमुने तपासणीत पाण्याची कठीणता, क्लोराइडस, लोह, नायट्रेट, प्लोराइडचे प्रमाण तपासल्या जाते. यात फ्लोराइडचे प्रमाण अधिक आढळल्यास त्या भागातील नागरिकांना किडनीशी संबंधित, दातांचे विकार, हाडे ठिसूळ होणे हे आजार जडतात. त्यामुळेे या सर्व रासायनिक घटकांचे प्रमाण योग्य संतुलित प्रमाणात आहे की नाही, यासाठी ही पाणी नमुन्यांची तपासणी आवश्यक आहे.
पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण
सार्वजनिकपिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणही वर्षातून दोनदा केल्या जाते. ग्रामपंचायतनिहाय एक जलसुरक्षक नियुक्त असून, त्याच्या माध्यमातून या नमुने तपासणीस सहकार्य करण्यात येते. जिल्ह्यात बुलडाणा येथे एक मुख्य प्रयोगशाळा असून, आता उपविभागीय स्तरावर मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव आणि दे.राजा येथे प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.
२७०० नमुन्यांची झाली तपासणी
जिल्हापाणी स्वच्छता मिशन कक्षांतर्गत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या उद््भवापैकी हजार २७३ ठिकाणांहून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. आतापर्यंत २७०० ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही रासायनिक पाणी नमुने तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने १२ घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८,८२३ प्रमुख पाण्याचे उद््भव असले तरी त्यापैकी जवळपास दीड हजार उद््भव हे कोरडे पडलेले असल्याने त्यांचा यामध्ये अंतर्भाव नाही. २,००० विहिरी, ५,२०० हातपंप, ६१ छोट्या विहिरी, २०७ पाॅवर पंप, १,१४० पाणीपुरवठा योजना, १०१ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या उद््भवामधील पाण्याचे नमुने यामध्ये तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.