आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disability Policy To Apply To The National Congress Party Round

अपंग धोरण लागू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीफेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शासनाने अपंग धोरण लागू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग विभागातर्फे 10 फेब्रुवारीला शहरातून फेरी काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.
देशातील इतर राज्यांत अपंगांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण आहे. सद्य:स्थितीत राज्यात विविध प्रवर्गातील अपंगांची संख्या 25 लाखांत आहे. अपंगांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या विकासासाठी शासनाकडे अपंगविषयक धोरण नसल्याने अपंग बांधव न्याय्य हक्कापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन दुर्लक्षित घटकाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त अभ्यास गटाने अपंगत्व येऊ नये, पुनर्वसनासाठी व अपंग व्यक्तीला समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष असा अपंग धोरण मसुदा तयार केला आहे.
पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय अपंग धोरण परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य शासनाकडे हा मसुदा सोपवून एक वर्ष उलटल्यानंतरही शासनाचे अपंगविषयक धोरण जाहीर झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग विभागातर्फे अपंग धोरण शासनाने लागू करावे यासाठी फेरीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देण्यात आले. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना महानगराध्यक्ष अजय तापडिया, अपंग विभागाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.