आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्‍या हस्‍ते अपंगांना तीनचाकी सायकलींचे वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गरजवंतांना मदत देण्याच्या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रमिलाताई ओक स्मारक समितीतर्फे शुक्रवारी सहा अपंगांना तीन चाकी सायकली व सात कर्णबधिरांना कर्णयंत्राचे वितरण करण्यात आले.

प्रमिलाताई ओक हॉलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले. या वेळी सिद्धार्थ धाबेकर व उत्कर्ष विकलांग कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित इंगळे उपस्थित होते. सुलेमान खान जहान खान यांनी बाबासाहेब धाबेकर यांचे स्वागत केले. या वेळी धाबेकर यांनी समाजातील गोरगरिबांना आर्थिक मदतीचा हात देण्यासोबतच इतरही लोकोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी प्रमिलाताई ओक स्मारक समितीतर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला असल्याचे सांगितले. आतापर्यंत शेकडो गरजवंतांना या उपक्रमांतर्गत लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप खाडे यांनी केले. कार्यक्रमास रमेश उके, प्रवीण मोहोड, अलका जोशी, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.