आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांपूर्वीच केली होती बेवारस मुलीची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या बाजूलाच १० डिसेंबरला चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीला सोडून देण्यात आले होते. त्या घटनेची तक्रार रामदासपेठ पोलिसात देण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
या आठवड्यातील उशिरा गुन्हा दाखल करण्याची ही दुसरी घटना आहे. १० डिसेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या बाहेर सायंकाळी वाजता एक नवजात मुलगी आढळून आली होती. ही मुलगी रुग्णालयात जन्मलेली नव्हती, तर ती बाहेर जन्मलेली असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला होता. त्या मुलीला रुग्णालयात दाखल करून घेऊन प्रशासनाने त्याच दिवशी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या दिवसांपासून पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, अल्पवयीन माताप्रकरणी तक्रार असतानाही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी घाईघाईत याप्रकरणी भादंवि ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चिमुकलीवर नवजात शिशू कक्षात उपचार सुरू आहेत.