आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या "त्या' २० दुकानांना नोटीस, शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजींची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सिव्हिललाइन्स परिसरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या "त्या' २० दुकानांचा करारनामा करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे, तर शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी ज्या दुकानांचा करारनामा संपला असेल, ती दुकाने ताब्यात घेऊन त्याचा परत लिलाव करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत केली आहे. त्यावर जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करण्याचा विचार करत असून, सोमवारपर्यंत "त्या' दुकानांना नोटीस देण्यात येणार आहेत.
सत्ताधारी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर बोट ठेवत शिवसेनेचे सदस्य करवसुलीच्या विविध उपाययोजना सुचवत आहेत. सिव्हिल लाइन्स परिसरातील मिनी मार्केटमधील दुकानांच्या मालकांकडून करारनामा करण्यात दिरंगाई थकित भाडे भरण्यासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता, या दुकानांचा फेरलिलाव करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली आहे.
21 पैकी केवळ एकानेच करारनामा केला असल्याने आजच्या तारखेत एकही दुकानदार दुकानाचा मालक कायद्याने असू शकत नाही. त्यामुळे सर्व दुकानांच्या फेरलिलावाची प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत सेनेचे सदस्य पांडे गुरुजींनी केली आहे. सिव्हिललाइन्स परिसरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या दुकानांचा फेरलिलाव केल्यास भाडेही वाढवण्यात सोयीचे होऊन जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. चंद्रशेखरपांडे, सदस्य, जिल्हा परिषद.
अनेक दुकाने भाजप कार्यकर्त्यांची
20 पैकी 15 दुकाने दुकाने भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे या दुकानदारांना इतर पक्षाचे पदाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप दुकानदारांकडून होत आहे.
करारनामा करण्यासाठी पुढाकार घ्यावा
दुकानांचाकरारनामा करण्यासाठी दुकान मालकांनी पुढाकार घ्यावा. कुणालाही त्रास व्हावा हा जिल्हा परिषद प्रशासनाचा उद्देश नाही. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या . गुलामहुसेन गुलाम नबी देशमुख, सभापती