आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Budget, Latest News In Divay Marathi

अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लांबणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण अर्थसंकल्पीय सभा गुरुवार, 6 मार्च रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी 2 वाजता आयोजित केली आहे. मात्र, बुधवार, 5 मार्चला आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा केवळ औपचारिकता म्हणून घेतली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार असल्याची कुणकुण लागल्याने आरोग्य व वित्त समिती सभापती राधिका पाटील यांनी घाईघाईनेच 4 मार्चला अर्थ समितीची सभा बोलावली. या सभेत 2013-14 मधील सुधारित अंदाजपत्रकाची 20.51 कोटी व 2014-15 साठी मूळ अंदाजपत्रकातील जवळपास 26 कोटी रुपये खर्चाच्या विनियोगाबाबत चर्चाही झाली. 6 मार्चला जिल्हा परिषद प्रशासनाने अर्थसंकल्पाबाबत निर्णय घेण्याकरिता जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आयोजित केली आहे. दरम्यान, 5 मार्चला आचारसंहिता लागल्याने सर्व नियोजन फिस्कटले आहे. यामुळे सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.