आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद बदल्यांमध्ये होतेय ‘मलई’चे राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -जिल्हा परिषदेंतर्गत करण्यात आलेल्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्यांमध्ये अनियमितता होत असल्याची चर्चा आहे. बदली प्रक्रियेदरम्यान काही विभागातील कर्मचार्‍यांवर अन्याय झाला, तर काही विभागातील विशिष्ट कर्मचार्‍यांना मात्र बदली प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने संबंधितांतून रोष प्रकट होत आहे. ‘मलई’मुळे सावळा गोंधळ झाल्याने अनेक कर्मचार्‍यांवर अन्याय झाला असल्याचे जि. प. वतरुळात बोलले जात आहे.
कर्मचार्‍यांची विनंती व प्रशासकीय कारणावरून बदल्या केल्या जातात. त्यानुसार सोमवारपासून बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांच्यासह विषय समिती सभापतींचा सहभाग होता. 19 मे रोजी बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तर 20 मे रोजी आरोग्य, पंचायत विभाग व सामान्य प्रशासन विभागातील एकूण 97 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये आरोग्य विभागाच्या 13, पंचायत विभागाच्या 12 आणि सामान्य प्रशासन विभागाच्या 72 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला ग्रहण लागले असले तरी अंतर्गत बदल्या मात्र सुरू आहेत.

अध्यक्षांपुढे कुणाचे काही चालेना

बदल्यांचे मेमो व्हिडिओ चित्रीकरण होत असल्याचा देखावा प्रशासनाकडून केला जात आहे. आत चित्र मात्र दुसरेच असल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई यांच्या र्मजीलाही तेवढेच महत्त्व बदली प्रक्रियेदरम्यान अधिकार्‍यांकडून दिले जात आहे. याशिवाय भारिप बहुजन महासंघ व भारतीय जनता पक्षाच्या काही जिल्हा परिषद सदस्यांकडून बदल्यामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. अध्यक्षांच्या कक्षामध्ये भाजपच्या काही सदस्यांचे वाढलेले वास्तव्यही बरेच बोलके आहे.