आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Health Officer,latest News In Divya Marathi

कट्यार येथे दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- तालुक्यातील कट्यार येथील दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. आतापर्यंत डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर गेली आहे, तरीसुद्धा आरोग्य विभाग मात्र, कुंभकर्णी झोपेतच आहे. जुलै महिन्यापासून कट्यार गावाला आजाराने ग्रासले आहे.
आरोग्य यंत्रणा मात्र, साथीचे आजार रोखण्यात अपयशी होत आहे. साचलेले गटार, अस्वच्छतामुळे गावात स्वतंत्र दुर्गंधी पसरली आहे. आता तर थंडीताप, हगवण या आजारांनी लहान मुले, वयोवृद्ध त्रस्त झाले आहेत. तापाने फणफणत असलेल्या रुग्णांवर गावात उपचार होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ऑक्टोबर रोजी राजाराम विठ्ठल सोळंके वय 70 यांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. ते अकोला येथील सहारा क्रिटिकल केअरमध्ये उपचार घेत होते. तसेच सविता राजेंद्र ढोरे यांचा 10 ऑक्टोबर रोजी डेंग्यूमुळेच मृत्यू झाला. त्या डॉ. रणजित कोरडे यांच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. गावात दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वरिष्ठांकडून दखल नाही
जिल्हाआरोग्य अधिकारी आरोग्य उपसंचालकाकडे अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र, त्‍यांच्याकडूनही कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातील अस्वच्छतेमुळे रोगराई पसरली आहे. कोणताही अधिकारी काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत जनतेला जीणे असह्य झाले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.