आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Political Leaders Celebrating Diwali With Their Family

जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींची दिवाळी कुटुंबीयांसमवेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नेत्यांची दिवाळी कुठे होणार, अशी उत्सुकता कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना दरवर्षी असते. मात्र, नेते मंडळीही घरच्या घरी दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असतात. काही नेत्यांनी मूळ गावी परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. काही नेते मंडळी फटाके फोडतात, तर काहींच्या दिवाळीत दिवाळी अंक हा महत्त्वाचा ठरतो. मात्र, सर्वांचा दिवाळीतील मुख्य अजेंडा परिवार हाच असतो.


साध्या पद्धतीने
दिवाळी ही साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरी करतो. काका, भाऊ यांच्या घरी जाऊन मोठय़ांचे आशीर्वाद या माध्यमातून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी विशेषांकांचे वाचन मागील अनेक वर्षांपासून करतो. यावेळीही ते कायम राहील.’’ संजय धोत्रे, खासदार, अकोला


पुण्यात
दिवाळीत निवांत वेळ मिळतो. परिवारासोबत साजरी करतो. प्रवासामुळे परिवारापासून दूर गेल्याने दिवाळी ही पुण्यात घरी साजरी केली जाते. परिवार आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करतो.’’ अँड. प्रकाश आंबेडकर, माजी खासदार, अकोला


परिवारासोबत
साध्या पद्धतीने हा सण मागील अनेक वर्षांपासून साजरा करत आहे. आनंदात साजरी करणे आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हाच मुख्य उद्देश ठेवत हा सण साजरा करतो. या काळात जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी होतात.’’ गोवर्धन शर्मा आमदार, अकोला (प.)


घरीच
कामकाजात संपूर्ण दिवाळी जाते. कुटुंबीयांसाठी काही वेळ दिवाळीत राखीव असतो. साध्या पद्धतीने दिवाळी साजरी होते. मागील अनेक वर्षे कामकाजात गेले. यंदा मात्र परिवारासोबत दिवाळी साजरी करणार आहे.’’ हरिदास भदे, आमदार, अकोला (पूर्व )


खेड्यावर
मागील अनेक वर्षांपासून मूळ गावी घुंगशी-मुंगशी येथे सहकुटुंब दिवाळी साजरी करतो. शेतीत परिवारासोबत जात शेतीच्या अवजारांचे पूजन करणे आणि प्रत्येकाशी संवाद साधणे हाच दिवाळीतील कार्यक्रम आहे.’’ डॉ. रणजित पाटील, आमदार.


पारंपरिक
पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. सिरसोली येथे दिवाळी साजरी करत होतो. सर्वच नातेवाईक, बहिणी दिवाळीत घरी येतात. त्यांच्यासोबत साध्या पद्धतीने फटाके फोडत दिवाळी साजरी करतो.’’ वसंतराव खोटरे, आमदार.