आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Superintendent Of Police Of Akola, News In Marathi

पोलिस ठाण्यांची नवी शक्कल, अधीक्षकांच्या नजरेमध्ये पडू नये, यासाठी रिकामे अवसान प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हापोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा रुजू झाल्यापासून शहरात पोलिसिंग असल्याचा अनुभव अकोलेकर अनुभवत आहेत. मात्र, पोलिस खात्याचे काम म्हणजे "जगन्नाथाचा रथ' नाही, येथे कर्तव्यात कसूर करता सर्वांना आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस अधीक्षकांच्या नजरेमध्ये आपण पडू नये, यासाठी रिकामे अवसान आणण्याचा प्रयत्न ठाणेदारांकडून होताना दिसत आहे. त्यातच काही "हुशार' ठाणेदारांनी आरोपींची नावे आणि गुन्ह्यांची माहितीसंदर्भात माध्यमांशी असहकाराची भूमिका घेतली आहे.
शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना तत्कालीन पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या कार्यकाळापेक्षा काहीअंशी कमी झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये पोलिस अधीक्षक आणि शहर पोलिस अधीक्षक बदलले. मात्र, ठाणेदार तेच आहेत, असे असताना गुन्हेगारी प्रवृत्तीने कारवाईचा धसका घेतला आहे. शहरातील सात ठाण्यांपैकी काही ठाणे सोडले, तर शहरातील काही भागांत गुन्हेगारीवर नियंत्रण आले आहे. दररोज क्राइम रिपोर्ट बघताना कोणत्या ठाण्यांतर्गत िकती गुन्हे घडले. याबाबत आढावा घेत असताना जिल्हा पोलिस अधीक्षकांना पोपटपंची ठाणेदारांविषयी आता माहिती मिळू लागल्याचे समजते. शहरातील दोन पोलिस ठाण्यांनी तर चक्क माध्यमांसोबत असहकाराची भूमिका घेतली आहे.
या ठाण्यांतील गुन्हेगारीचे प्रमाण इतर ठाण्यांच्या तुलनेत जास्तच आहे. त्यामुळे आपली पोलखोल होऊ नये, यासाठी माध्यमांना दोन हात दूर ठेवण्यात या ठाण्यांनी धन्यता मानली आहे. आमच्या तपासावर त्याचा परिणाम होतो, असे पालूपद ते लावत आहेत. आरोपींची नावे प्रसिद्ध झाल्यामुळे आरोपींना समाजात मान खाली घालावी लागते, त्यासाठी अशा आरोपींची नावे प्रसिद्ध करण्यात गैर काय. मात्र, आपण केलेल्या कारवाया त्यामध्ये असलेले आपले सेटिंगचे बिंग फुटू नये, याची भीती त्यांना असल्यामुळे असहकाराची भूमिका दिसून येते.

खंडणीतील आरोपींचा शोध नाहीच
चिखलपुरामध्ये खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वास्तव्यास आहेत, हे पोलिसांनी यापूर्वीच केलेल्या कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. रामदासपेठ पोलिसांनी िबल्डरांना खंडणी मागणाऱ्यांना पकडले होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी दोन संशयितांना पकडून ठाण्यात आणले होते. नंतर मात्र ते त्यातील नव्हेतच, म्हणून सोडून दिले. मग खरे कोण?
सर्वाधिक गुन्हे सिव्हिल लाइन्स आणि कोतवालीमध्ये
शहरामध्येसद्य:परिस्थितीत गुन्ह्याचे प्रमाण सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे आणि सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिसून येत आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात खंडणीखोरांनी आपले तोंड बाहेर काढले आहे, तर दिवसा लुटमारीच्या घटना घडत असताना तपास मात्र शून्य दिसून येत आहे. गुन्ह्यांचा शोध लावण्यात माहीर असलेले हे पोलिस ठाणे काही दिवसांपासून ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी एका हरवल्याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा उघड केला होता, हे विशेष.