आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Youth Congress,latest News In Divya Marathi

युकाँच्या 23 पदाधिका-यांचे राजीनामे, पक्षविरोधी कारवायांची प्रदेशाध्यक्षांना माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भाजपमधूनआलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ व्यक्तीवर कारवाई केली जाते. याचा निषेध करत अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह एकूण २३ कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्याकडे राजीनामे सादर केले. यामुळे काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसला आहे.
संबंधित उमेदवाराच्या प्रभागातही यापूर्वी लोकसभा विधानसभेत किती मते पक्षाला मिळाली? ही बाबही पक्षाने तपासून पाहावी. त्यामुळे अशा व्यक्तीच्या, काही स्थानिक नेत्यांच्या षड्यंत्राला बळी पडून पक्षाशी एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ही पक्षासाठी हानीकारक बाब आहे, असे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. पहिल्या सत्रात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अंशुमन देशमुख, महासचिव अतुल भालतिलक, अकोला पूर्व विधानसभेचे उपाध्यक्ष पराग कांबळे, अकोला पश्चिम विधानसभेचे उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख सलीम, अकोला पश्चिमचे महासचिव महंमद शारीक महंमद फारुख, फरहाद इर्शाद खान, अमित इंगोले, स्वप्ना मसराम, मंजू मिश्रा, मोहन कल्याणकर, गणेश टांक, हिरा शहा, अखिलेश दुबे, चंद्रदेव पांडे, छाया मुराई, गोपाल सोनटक्के, गजानन शिरसाट, नुमान खान, इस्माइल खान इमदाद खान, अब्दुल बशीर अब्दुल रऊफ, शेख मतीन शेख सलीम, सय्यद जाहेद सय्यद जानी यांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनामा सत्र सुरूच राहणार : निलंबनप्रकरण कार्यकर्त्यांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या एकाच वेळी २३ जणांनी राजीनामे दिले. हे सत्र हे पुढेही सुरूच राहणार असून, येत्या काही दिवसात आणखी काही पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मनाने दूर गेलेल्यांवर कारवाई कशी ? : काँग्रेसमधीलया प्रकाराबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे. अंतर्गत लाथाडीमुळे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मनाने दूर गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसपासून मनाने दूर गेलेल्या कार्यकर्त्यांवर कशी कारवाई कराल? असा प्रतिप्रश्न ज्येष्ठ कार्यकर्त्याने केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर हादरा :
मतदानालाकाही दिवस उरले असताना नगरसेवकांसह दहा जणांवर निलंबनाची कारवाई, त्यापूर्वी माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडणे आणि आता युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे राजीनामे, या सर्व प्रकाराचा फटका पक्षाला बसेल, अशी चर्चा पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
संधी देणे गरजेचे होते : ज्यापदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबाबत प्रदेशाध्यक्षांना माहिती पाठवली, त्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पक्षविरोधी कारवाया थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, संबंधिताना पक्षातून निलंबित करण्यापूर्वी त्यांना समजही दिली नाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई ही हेतुपुरस्सर असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.