आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी’तर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून ‘दिव्य मराठी’साठी दुआ मागितली. निमित्त होते, दैनिक दिव्य मराठीच्या वतीने 24 जुलैला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या टेरेसवर आयोजित इफ्तार पार्टीचे. या इफ्तार पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. एखाद्या वृत्तपत्राच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन शहरात प्रथमच करण्यात आल्याने, अनेक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘दिव्य मराठी’चे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. अजान अबरार अहमद खान यांनी दिली. मौलवी कारीममुसद अहमद खान यांनी नमाज पठण केले, तर मौलवी अब्दुल रहमानखान साहब यांनी तकरीर केली. यावेळी महापौर सौ. ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, डॉ. जिशान खान, विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी, युवा नेता गौतम गवई, गटनेते गजानन गवई, अफसर कुरेशी, अनहलक कुरेशी, महंमद साहेब, भाजप अल्पसंख्याक युवा मोर्चाचे अध्यक्ष साजीद खान, अजहर खान, तौशिफखान, हारुण चौधरी, सलीमभाई, जावेदभाई श्रीराम ट्रान्सपोर्टवाले, महंमद अल्ताफ, महंमद शरीक, हाजी अब्दुल वाहिद, नौशाद खान, फैयाज खान, अविनाश देशमुख, विनोद मापारी, सौ.उषा विरक, सौ. सुषमा निचळ, अँड. धनश्री देव-अभ्यंकर, जावेद झेकरीया, सरदार खान, अकील अहमद कुरेशी, युसूफ सर, शहजाद खान, महेमूदभाई, शहजाद अन्वर, अतिकुर्ररहमान, डॉ. फारुख शेख, अनिल बिडवे, कैलास पुंड, राजेंद्र घनबहादूर, रवींद्र शिरसाट, नारायण वाघकर, योगेश मारवाडी, संजय चव्हाण, किशोर सोनट्टके, नरेश टमटमकर, मुस्लिम युवा मंचचे शाहिद खान, शेरू साहेब, जहागीर खान, मौलवी नदीम, शौकत भाई आदींसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सहभागी झाले होते.