आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात झगमगाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- इतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे कामकाजाचे तास निश्चित नसणे, शिवाय रिक्त पदांमुळे रजा न मिळणे, अशा प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणारे पोलिस वेळात वेळ काढून पोलिस ठाण्यातच दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी पोलिस ठाण्याची स्वच्छता करण्यात आली असून, दिव्यांची आरासही करण्यात आली आहे.

गृहखात्याच्या लेखी अकोला अतिसंवेदनशील जिल्हा आहे. घरफोडी, लुटमार, टोळीयुद्ध, सशस्त्र हाणामारीच्या घटना जिल्ह्यात नेहमीच घडतात. अकोल्यात विविध धार्मिक उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यात येतात. तसेच शहरात लोकप्रतिनिधी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे नेहमी येणे-जाणे असते. परिणामी वेळोवेळी येणारी बंदोबस्ताची जबाबदारी, कायदा-सुवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवणे, गुन्हे उघडकीस आणण्यात मनुष्यबळ व इतर सुविधांअभावी पोलिस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

दिवाळीसारखे सण कुटुंबासोबत साजरे करणे सर्व पोलिसांना शक्य होत नाही. नागरिकांना दिवाळीसारखा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी पोलिस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत.