आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor's Illegal Business Disclose Shankar Vakode

डॉक्टरांचे अवैध धंदे उघडकीस आणणार,छावाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरामध्ये अनेक डॉक्टर रुग्णांची लूट करत आहेत. त्या डॉक्टरांचे अवैध धंदे आपण न्यायालयीन मार्गाने उघडकीस आणू. कोणीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जशाच तसे उत्तर देऊ, असे प्रतिपादन छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शंकरराव वाकोडे यांनी केले. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉक्टरच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी छावाचे महानगराध्यक्ष अश्विन नवले चंद्रकांत झटाले यांच्याविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. मात्र, डॉक्टर समीर मालविया अविनाश उंबरकर यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार देऊनही पोलिसांनी अश्विन नवले झटालेची तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे छावा संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यावरून छावाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी डॉ. शंकरराव वाकोडे म्हणाले की, अश्विन नवले चंद्रकांत झटाले यांनी कुणासही लाच मागितली नाही. सत्य उघड होणार या भीतीने या प्रकरणात स्वत:च्या बचावासाठी अवैध पॅथलॉजी लॅब संचालक अविनाश उंबरकर यांच्यावर डॉ. मालविया यांनी दबाव टाकून पोलिसांची दिशाभूल करून सत्य पुढे आणणाऱ्या छावाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. उंबरकार यांनी मार्च रोजी तक्रार दाखल केली, की अश्विन नवले चंद्रकांत झटाले यांनी मला पैसे द्या नाहीतर तक्रार देतो. जेव्हा की चंद्रकांत झटाले यांनी मार्च रोजी दुपारी ४.४० वाजता सिव्हिल लाइन्स पोलिस चौकी येथे रुग्णांची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. मार्च रोजी डॉक्टरांवर कुठलीही कारवाई झाल्याने सिव्हिल लाइन्स ठाणेदार, मनपा आयुक्त, सीएस यांना कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. डॉक्टरांच्या विरुद्ध न्यायालयीन लढा देण्याचा इशारा देण्यात आला.