आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Domestic Animals Health Problem In Akola Veterinary Doctors Not Available

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पशुसंवर्धन विभाग वार्‍यावर; पशुपालकांना घ्यावी लागते शहराकडे धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गुरांढोरांना विविध आजारांची लागण झाली आहे. खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकही गावात उपलब्ध नसल्याने पशुपालकांना अकोला शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र, तालुक्याच्या ठिकाणी तसेच अकोला शहरातील पशुचिकित्सालयामध्ये पशुचिकित्सक उपस्थित राहत नसल्याने पशुपालकांची तारांबळ उडते.

पशुचिकित्सालय दोन प्रकारचे असून, जिल्हा परिषदेअंतर्गत असलेली पशुचिकित्सालये ग्रामीण भागात तर शहरातील राज्य विभागाच्या अखत्यारित येतात. अकोट,बार्शिटाकळी,बाळापूर, तेल्हारा आणि अकोट या तालुक्यांच्या ठिकाणी लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये आहेत. याठिकाणी पशुवैद्यकासह कर्मचार्‍यांची नियुक्ती स्वतंत्ररित्या करण्यात आली आहे. अकोला शहरात पंचायत समितीच्या बाजुला पशुचिकित्सालय आहे. पशुचिकित्सालयाच्या वेळा ऋतुनुसार बदलत असल्याचा दावा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अशोक हजारे यांनी केला आहे. वास्तविकत: सकाळी आणि सायंकाळी दवाखाने उघडे असतील, तर पशुपालकांना होणारा त्रास हा आश्चर्याची बाब बनली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पशुंना विविध आजारांची लागण होत आहे. मात्र, वेळेवर शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत वेळेवर उपचार मिळत नसल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तर पर्यायाने खासगी पशुवैद्यकांकडे पैसे मोजावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही बसतो तो वेगळाच.

पावसाळ्यात पशुंना मोठय़ा प्रमाणात आजाराची लागण होते. ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारच्या पशुवैद्यकाची सुविधा उपलब्ध नसते. परिणामी शेतकर्‍यांना शेतीची कामे टाकून जनावरांना उपचारासाठी शहराच्या ठिकाणी न्यावे लागते. मात्र शहरातील पशुचिकित्सालयाच्या वेळा माहिती नसल्याने त्यांची तारांबळ उडते. नाइलाजाने शेवटी खासगी पशुवैद्यकाला दाखवून घरी परतावे लागत असल्याचे वास्तव आहे.

पशुंना होणारे आजार, घ्यावयाची काळजी

पावसाळयात उद्भवणारे आजार
घटसर्प, फर्‍या, एक टांग्या, तोंडखुरी, पायखुरी, तीवा यांसारखे आजार पावसाळ्यात पशुंना उद्भवतात. पावसात भिजल्याने किं वा अस्वच्छ वातावरणात पशुचा संहार असेल, तर हे आजाराची प्रामुख्याने लागण होते. ’’ डॉ.सुरेश बचे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

उद्भवणारे आजार
पशुपालक मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील पंचायत समितीसमोरील पशुचिकित्सालयात येत आहे. मात्र, याठिकाणी डॉक्टरांची अनुपस्थिती आढळून येत आहे. त्यामुळे शेवटी शनिवारी मी खासगी पशुवैद्यकामार्फत बैलावर उपचार केलेत. ’’ हेमंत गाडगे, पातूर

ऋतुप्रमाणे दवाखान्याची उपलब्धता
शहरी तसेच ग्रामीण भागातील पशुचिकित्सालये ही विशिष्ट ऋतुप्रमाणे उघडी ठेवली जातात. साधारणपणे सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते 6 ही दवाखान्याची वेळ असते, तर काही महिन्यांत सकाळी 8 ते 1 व दुपारी 3 ते 5 या वेळेत पशुदवाखाने उघडी ठेवली जातात. त्यामुळे त्या वेळेत पशुपालकांना जनावरांवर उपचार करून घेता येते. डॉ.अशोक हजारे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अकोला

पशुंना कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवा.
शक्य असल्यास स्वतंत्र गोठा तयार असावा.
गुरांचे खाद्य जमिनीवर न टाकता प्लास्टिक टोपल्यात ठेवा.
पशु आजारी असल्याचे लक्षात येताच तत्काळ पशुचिकित्सालयात उपचारासाठी न्यावे.