आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी हत्याकांडाचा तपास मंदावला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - माय-लेकीच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांचा तपास मंदावला असून, आठवड्याचा कालावधी उलटूनही आरोपींचा थांगपत्ता लागत नाही आहे. 18 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ज्योती शर्मा आणि राणी उर्फ ऐश्वर्या शर्मा या दोघी माय-लेकीचा खून झाला होता.

मुलगा आदित्य शर्मा घटनेपासूनच फरार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचे निरीक्षण करण्यात आले तसेच पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्यासह सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार प्रकाश सावकार आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिस वेगवेगळ्या दिशेने तपास करत असले, तरी त्यांना पाहिजे त्या प्रमाणात दुहेरी हत्याकांडातील तपास कार्याला यश आले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी माय-लेकीच्या हत्येप्रकरणी वेळोवेळी माहिती घेत आहेत. मात्र, पोलिसांना आठवड्याभरापासून कोणताही प्राथमिक सुगावा सापडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस तपासात काय सत्य उजेडात येते याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. या हत्याकांडातील काही सुगावा मिळतो का? यासाठी पोलिसांनी छत्तीसगढ व नाशिक येथे पोलिसांची पथके आदित्य शर्मा याच्या शोधकार्यासाठी रवाना केली आहेत. त्यामुळे या प्रकरणात पेलिसांनी आपल्या तपासाची गती वाढविण्याची मागणी होत आहे.