आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यातील दुहेरी हत्‍याकांडाचा तपास घुटमळतोय घटनास्थळाभोवतीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रणपिसेनगरातील रेणुका अपार्टमेंटमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या हत्याकांडाचा तपास घटनास्थळाच्या भोवतीच घुटमळत आहे. शनिवारी पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली. ज्योती गोंविद शर्मा आणि ऐश्वर्या उर्फ राणी गोविंद शर्मा यांचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती.
पोलिसांनी रणपिसेनगरासह रेणुका अपार्टमेंटमधील रहिवाशांची चौकशी केली. पोलिसांनी गोंविद शर्मा यांचा बेपत्ता असलेल्या आदित्यच्या मित्रांची चौकशी केली. मात्र, पोलिसांना शनिवारीही हत्याकांडाचे रहस्य कायम होते.
फ्लॅटची पाहणी थांबेना
माय-लेकीच्या हत्याकांडप्रकरणी 21 डिसेंबरला दुपारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी शर्मा यांच्या फ्लॅटची पाहणी केली. पोलिस अधिकार्‍यांनी बंदद्वार चर्चा केली.
चौकशीचे सत्र सुरूच
माय-लेकीच्या हत्याकांडप्रकरणी पोलिस अधिकार्‍यांनी शनिवारीही अनेकांकडून माहिती जाणून घेतली. त्यांच्याकडून संशयितांबाबतची माहिती गोळा केली. मात्र, अद्यापही पोलिसांना हत्याकांडाचा गुंता सोडवण्यात यश आलेले नाही.
रक्ताने माखलेली काच जप्त :
पोलिसांनी रेणुका अपार्टमेंटच्या सर्व्हिस गल्लीची पाहणी केली. पोलिसांनी रक्ताने माखलेला काच आढळून आला. श्वानही घटनेच्या दिवशी सर्व्हिस गल्लीकडे धावला होता.