आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय लेक हत्‍याकांडाचा शोध घेण्‍यासाठी आदित्यच्या मित्रांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रणपिसेनगरातील रेणुका अपार्टमेंटमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सोमवारी जबाब नोंदवण्याचा फेरा सुरूच ठेवला. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या आदित्य शर्माच्या मित्रांची चौकशी केली. ज्योती गोविंद शर्मा आणि राणी उर्फ ऐश्वर्या गोविंद शर्मा यांचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना 18 डिसेंबरला घडली होती.
गोविंद शर्मा यांचा मुलगा आदित्य हा घटनेपासूनच बेपत्ता आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तो हरवल्याची नोंदही केली. आदित्य हा नागपूर आणि हैदराबाद येथे शिक्षणासाठी होता. त्यानंतर तो दोन महिन्यांपूर्वी पुण्यात आयसीआयसीआय बँकेत रुजू झाला. पोलिसांनी सुरुवातीला शर्मा कुटुंबीय आणि त्यांच्या परिचितांचे जबाब नोंदवले. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी आदित्यने शिक्षण घेतलेल्या ठिकाणच्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सोमवारी आदित्यच्या काही मित्रांची चौकशी केली. पोलिसांनी आतापर्यंत नोंदवलेल्या जबाब आणि ही चौकशी जुळवण्याचा प्रयत्न केला