आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Deshmukh Enter In Bhj Party News In Marathi, Divya Marathi

डॉ. देशमुख यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा! तावडे, मुनगंटीवार यांनी दिले संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ज्या मतदारसंघातील पराभव दहा हजारांपेक्षा जास्त मतांचा आहे, अशा ठिकाणी दुसर्‍या पक्षाच्या दमदार नेतृत्वाला उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सांगत विनोद तावडे यांनी तर रावणी संस्कृतीविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यातील काही विभिषणांना सोबत घ्यावेच लागेल, असे म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा भाजपप्रवेश आणि उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विभागस्तरीय आढाव्यानिमित्त गुरुवारी भाजपचे काही वरिष्ठ नेते अमरावतीत होते. या वेळी दोघांनीही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन या मुद्दय़ावर भाष्य केले. हे भाष्य डॉ. देशमुख यांच्या प्रवेश व उमेदवारीबाबत अनुकूलता दर्शवणारे आहे. प्रवेश आणि उमेदवारीच्या मुद्दय़ावर तावडे फारसे बोलले नाहीत. मात्र, दुसर्‍या पक्षातील लोकांना प्रवेश देताना त्यांची स्थानिक पातळीवरील प्रतिमा, त्यामुळे भाजपला होणारे फायदे-तोटे आणि भाजपमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मत या बाबी विचारात घेतले जाईल, असे त्यांचे म्हणणे होते.