आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागानेच लोकोपयोगी कार्य शक्य : डॉ. संतोष कोरपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकोपयोगी कार्य तडीस नेण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनी केले.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएम कार्ड लोकार्पण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शा. द. वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेला 106 वर्षांचा इतिहास असून, मार्च 2015 पर्यंत अकोला व वाशीम जिल्हय़ातील 1 लाख बँक खातेदारांना एटीएम कार्ड सुविधा पुरवणार असल्याचे डॉ. कोरपे म्हणाले. खातेदारांचा प्रतिसाद पाहून बँक खातेदारांना क्रेडिट कार्डसुद्धा उपलब्ध करून देण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र भालेराव यांनी केले. या वेळी डॉ. अभिजित वैद्य, संतोष देसले, र्शीकांत चाळीसगावकर, स्मिता धामणे, जयर्शी देशपांडे, सुनील जानोकार, रवींद्र मानकर, अनिल अंभोरे, अंकुश पटेल, प्रदीप खाडे, अमित महल्ले, अनंत गद्रे, सुरेशचंद्र जगताप, राजेश आमले, अनिल राऊत, सुधीर देशमुख, विनायक भोपाळे, अनंत वैष्णव यांना अतिथींच्या हस्ते एटीएम कार्ड प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित वैद्य, प्रदीप खाडे व सावरकर यांनी विचार व्यक्त केले. या प्रसंगी बँकेचे संचालक, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, रामसिंग जाधव, प्रकाश लहाने, प्रा. हरिभाऊ हिवरे, प्रकाश कुटे, राजू राऊत, राजा बोर्डे, बी. जे. काळे उपस्थिती होती. आभार प्रदर्शन बँकेचे व्यवस्थापक अनंत वैद्य यांनी केले.