आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्‍ाी विद्यापीठाच्‍या मॉडेलची शेतीसाठी शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या सहभागाने त्यांच्या शेतावर संशोधन हा कृती कार्यक्रम खारपाणपट्ट्यासाठी हाती घेतला आहे. संयुक्त कृषी संशोधन परिषदेत वेळोवेळी काही शिफारशी केल्या आहेत. संशोधनाचा मुख्य कार्यक्रम दर्यापूर तालुक्यातील रामागड, रामगाव, महिमापूर, नरदोडा आणि अकोट तालुक्यातील कुटासा, देवरी आदी गावांमध्ये राबवला गेला.
खारपाणपट्ट्यातील जमिनीचे गुणधर्म लक्षात घेऊन पर्जन्य व्यवस्थापनाचा आदर्श आराखडा यावर भर देण्यात आला. अलीकडचे लहरी पर्जन्यमान, कमी वेळात अधिक पाऊस पडणे, पावसाची अनिश्चितीकिंवा अति पावसामुळे निचऱ्याचा निर्माण होणारा प्रश्न नित्याचे झाले आहे. बदललेल्या पर्जन्यमानात साजेशी शेती करणे म्हणजे मशागतीच्या पद्धतीत बदल क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करताना गादी वाफे तयार करणे, पाऊस पडण्यापूर्वी नंतर विशिष्ट पद्धतीची रानबांधणी करणे आवश्यक आहे.
पाऊस पडल्यानंतर उताराला आडवी कास्तकारी पेरणी करणे तसेच समतल कास्तकारी पेरणी करणे, शेतात समतल मार्गदर्शक गवती बांध तयार करून त्याला समांतर कास्तकारी, पेरणी करावी, मूलस्थानी जलसंधारण करून उर्वरित शेततळ्यात जमा करणे, दोन पावसातले अंतर वाढले असता पाण्याचा फवारा संरक्षित आेलितासाठी वापरणे.
खारपाणपट्ट्यातील शेततळ्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी फांदेरी सांडव्याचा वापर करणे तसेच शेततळ्यात मासे टाकून मत्स्य व्यवसायातून अधिक प्रमाणात उत्पन्न प्राप्ती करणे. शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी िनंबोळीच्या तेलाचा वापर करणे इत्यादी बाबींचे अवलंबन म्हणजेच डॉ. पंदेकृवि मॉडेल आहे. या मॉडेलच्या अवलंबनातून अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. डॉ. विजय केळकर समितीने रामागड गावाला २०१२ साली भेट दिली होती. िवद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. त्या वेळी समिती सदस्यांनी रामागड अन्य गावातील शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानुसार मॉडेलच्या धर्तीवर खारपाणपट्ट्याचा विकास व्हावा, अशी शिफारस करण्यात आली होती. डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केळकर समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. कृषी विद्यापीठाचे जल मृद संधारण विभागप्रमुख डॉ. सुभाष टाले यांनी हे संशोधन खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाने केले असून, त्यामुळेच विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना आश्वासक करण्यासाठी संशोधन उपयोगी सिद्ध झाले आहे.