आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनोदच्या आत्महत्येस जबाबदारांची गय नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॉ. रणजित पाटील यांनी तळेगाव बाजार येथे वीज वितरणच्या कारभाराची पाहणी केली)
तेल्हारा- वीज जोडणी मिळत नसल्याने विनोद खारोडेसारख्या तरुणाने आत्महत्या केली, ही अतिशय गंभीर दु:खद बाब आहे. त्याच्या आत्महत्येस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उद्गार पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तळेगाव बाजार येथे काढले. डॉ. पाटील यांनी गुरुवारी विनोद खारोडे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
विनोद रामदास खारोडे या २४ वर्षीय युवा शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सेंट्रल मध्यवर्ती बँकेचे कर्ज काढून २०१३ मध्ये बोअरवेल केले वीजजोडणीसाठी अर्ज केला. मात्र, वीजजोडणी मिळत नसल्याने त्याने हिवरखेड येथील विद्युत कार्यालयात १९ मे रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आज तळेगाव बाजार येथे जाऊन विनोदच्या परिजनांची भेट घेत वास्तविकत: जाणून घेतली. या घटनेच्या मुळात शिरून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. ही घटना दुर्दैवी असून, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले.
दरम्यान, त्यांनी गावामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत तारा फुटलेल्या रोहित्राची पाहणी करून विनोदच्या शेताचीही पाहणी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार सचिन पाटील, तालुका कृषी अधिकारी रामराजे घोडवे, एकनाथ ताथोड, जनार्दन खारोडे, डॉ. खारोडे, अरुण खारोडे, हरिदास खारोडे, मधुकरराव राऊत, अतुल पिलात्रे, रावसाहेब खारोडे, धनश्याम अग्रवाल, किशोर मालोकार, सदानंद खारोडे, सुभाष भड, चंद्रकांत गायकवाड, सुधाकर भोंडेकर, संजय चोपडे, किशाेर मालोकारसह गावातील नागरिक उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनीही आपापल्या समस्या मांडल्या.
बातम्या आणखी आहेत...