आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीला मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीला इंजिनिअर बनवण्यासाठी बार्शिटाकळी येथील गुलामनबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांनी पुढाकार घेतला आहे. दहावीत गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालयातून ८७ टक्के गुण मिळवत आरती धनराज ओहे परिसरातून प्रथम आली आहे.
अकोला तालुक्यातील निंबोरा येथील धनराज ओहे या शेतकऱ्याने १७ मे रोजी कर्जबाजारीपणा नापिकीमुळे आत्महत्या केली होती. आरतीने विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअर होण्याचे स्वप्न वडिलांजवळ बोलून दाखवले होते. मात्र, कायमची नापिकी शिवाय डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशा परिस्थितीत मुलीला कसे शिकवायचे, हा प्रश्न धनराज आेहे यांना भेडसावत होता.
अशातच कर्जाला कंटाळून त्यांनी घरात आत्महत्या केली. आरतीची शिक्षणाची तळमळ वडिलांनी केलेली आत्महत्या याबाबत गुलामनबी आझाद महाविद्यालय, बार्शिटाकळीचे प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांना माहिती मिळाली. १९ जून रोजी डॉ. पवार यांचा वाढदिवस होता. मात्र, कपाळाला पत्नीकडून औक्षण करता त्यांनी थेट निंबाेरा गाव गाठले. आरतीची भेट घेतली. तिची आई हर्षा काका राजेश ओहे यांचे सांत्वन केले. तिला दहा हजार रुपये दिले. आरतीच्या शिक्षणासाठी जो खर्च येईल तो सर्व खर्च स्वत: करणार, अशी ग्वाही त्यांनी हर्षाबाईंना दिली. या वेळी महाविद्यालयातील सहकारी उपप्राचार्य आर. आर. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य निरीक्षक प्रा. आर. पी. राठोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज देशपांडे, प्रा. पी. एन.चव्हाण, प्रा. डी. एस. राठोड, निंब्याचे प्रा. उल्हास जाधव उपस्थित होते.
समाजमन हेलावले : उपविभागीयअधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनीही तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे. या तयारीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

आरएलटीमध्ये शिकणार आरती : आरतीच्या शिक्षणासाठी प्राचार्य डॉ. पवार यांनी अकोला येथील आरएलटी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांच्यासोबत बाेलले आहे. तिला अकरावीत मोफत प्रवेश मिळणार आहे, तर वह्या, पुस्तके, कपडे आदी सर्व खर्च डॉ. मधुकर पवार करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...