आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद सोमवार: ११ सुवर्णपदके मिळवून वाढवली अकोल्याची शान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्याची सुपुत्री डॉ. नाझीम अलमास यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी परीक्षेत तब्बल ११ सुवर्णपदके पटकावली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात एकाच विद्यार्थाने राज्यातून पहिल्या क्रमांकाची ११ सुवर्णपदके पटकावणे हा तसा दुर्मिळ योग आहे. मात्र, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. अलमास यांनी अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात डॉ. अलमास यांना पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला.
अकोल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मुन्ना खान यांची डॉ. नाझीम अलमास सय्यद ही स्नुषा आहे. डॉ. अलमास यांनी शासकीय रुग्णालय नागपूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या मुंबई येथील जे. जे. मेडिकल कॉलेज येथे रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडी करत आहेत.
या सुवर्णपदकांचा आहे समावेश
- स्व. डॉ. दयानंद डोणगावकर सुवर्णपदक (एमबीबीएसमध्येसर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल)
- स्व. व्यंकटेश जामकर सुवर्णपदक (पाचहीवर्षांत सर्वाधिक गुण)
- राजेबहाद्दर हार्ट फाउंडेशन सुवर्णपदक (एमबीबीएसच्यातिसऱ्या वर्षातील पहिल्या क्रमांक)
- क्रांतिज्योती डॉ. रखमाबाई मेमोरियल सुवर्णपदक (मुलींतूनपहिल्या आल्याबद्दल)
- स्व. श्री. श्रीराम कुशबा बाकरे मेमोरियल सुवर्णपदक (सर्वाधिकगुण तृतीय वर्ष)
- डॉ. कमलताई देशमुख सुवर्णपदक
- गोजरबाई रामराव भामरे सुवर्णपदक À डॉ. शिरीष के. भंसाली सुवर्णपदक (जनरलसर्जरी विषयात सर्वाधिक गुण)
- जॉन्सन अँड जॉन्सन मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड
- श्यामराव मांगो नानासाहेब चौधरी सुवर्णपदक
बातम्या आणखी आहेत...