आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजक्याच पाण्याने कशी भागेल तहान?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काटेपूर्णा प्रकल्पात सद्य:स्थितीत २३ हजार लाख लीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, जिल्‍हाची गरज २२ हजार लाख लीटर पाण्याची आहे. त्यामुळे मोजकेच पाणी शिल्लक असल्याने या वर्षी पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. पाणीप्रश्नाबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षणाची बैठक झाली, त्यात हे वास्तव समोर आले.
जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, महापालिकेचे अभियंता गुजर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लोळे यांनी काटेपूर्णा, उमा, खांबोरा आदी प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेचे गुजर यांनी अकोला शहराला आवश्यक असलेल्या पाण्याची गरज सांगितली. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची आवश्यकता किती आहे ते सांगितले. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी समोर मांडलेल्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याचे वास्तव पाटबंधारे *विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.

अशी आहे गरज
*अकोला महापालिका -१४.४९ हजार लाख लीटर
*मत्स्य बीज प्रकल्प -हजार लाख लीटर
*६० खेडी योजना -४.८० हजार लाख लीटर
*खांबोरा खेडी -हजार लाख लीटर
*एकूण -२२ हजार लाख लीटर आवश्यकता
३१.१४ हजार लाख लीटर उपलब्धपाणी - ३६ टक्के २३.३६हजार लाख लीटर बाष्पीभवननंतरचेपाणी (अंदाजे)

पाणी जपून वापरा
गरजेच्यातुलनेतअत्यंत कमी पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे. कोणत्याही गावातील नागरिक तहानलेला राहणार नाही, याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. विजयलोळे, कार्यकारीअभियंता, पाटबंधारे विभाग