आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला माय-लेकीच्‍या हत्‍याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करताहेत तपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रणपिसेनगरातील रेणुका अपार्टमेंटमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या हत्याकांड प्रकरणाचा गुंता अद्यापही कायम आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी शर्मा कुटुंबीयांच्या नातेवाइकांकडून व आदित्यच्या मित्रांकडून माहिती घेतली.

रणपिसेनगरातील रेणुका अपार्टमेंटमध्ये ज्योती गोविंद शर्मा आणि राणी उर्फ ऐश्वर्या गोविंद शर्मा यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना 18 डिसेंबरला घडली होती. या हत्याकांडप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपार्टमेंटमधील रहिवासी आणि शर्मा कुटुंबीयांची चौकशी केली. गोविंद शर्मा यांच्याकडूनही माहिती घेतली होती. घटनेच्या दिवसापासून आदित्य शर्मा बेपत्ता आहे. या हत्याकांडाचा तपास लावण्यात सिव्हिल लाइन पोलिसांना यश न आल्याने तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. चार दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गोविंद शर्मा यांची चौकशी केली. आदित्यच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने काल बुलडाणा जिल्ह्यातील आदित्यच्या मित्रांकडून माहिती घेतली. शनिवारी पथकाने शहरातील शर्मा कुटुंबाच्या नातेवाइकांकडून माहिती घेतली. आदित्यच्या मित्रांचीही चौकशी केली. मात्र, पथकाला काही ठोस माहिती मिळू शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आदित्यच आरोपी? :
पोलिस आदित्यचा शोध घेण्यासाठी विविध स्तरावरून माहिती गोळा करत आहे. हत्या आदित्यनेच केल्याचा विश्वास पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आदित्यचे भाषेवर प्रभुत्व :
आदित्य दुसर्‍या राज्यात गेला का, याची माहिती पोलिस घेत आहे. तो दुसर्‍या राज्यातही नोकरी करू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

प्रकरणाचा तपास सुरू
दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू आहे. पथकाने विविध स्तरावर माहिती काढली आहे. त्यादृष्टीने आम्ही तपासात पुढे गेलो आहोत. आदित्यनेच हे हत्याकांड केले असा संशय आहे.’’

सुभाष माकोडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा