आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To Insufficient Stocks Of Medicines Worse Condition Of Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्ण मरताहेत; मंत्री म्हणतात, 'माझ्या हातात काहीच नाही'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अपुरा औषधी साठा डॉक्टरांची अनुपस्थितीमुळे सर्वोपचारमध्ये रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी असल्याचा आरोप आमदारांनी केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडेंनी एकाही समस्येचे निरसन करता उलट माझ्या हातात काही नाही, असे सांगितले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील बैठक वायफळ ठरली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे अकोला जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले असताना दुपारी ३.१५ वाजता त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. दरम्यान, रुग्णालयाचे गत दहा वर्षांत एकदाही "वर्क ऑडिट' झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. "वर्क ऑडिट' झाल्याने नेमके रुग्णालयात काय सुरू आहे, हे समजून येत नाही. त्यामुळे वर्षातून एकदा रुग्णालयाचे वर्क ऑडिट झाले पाहिजे, असा सल्ला तावडे यांनी बैठकीत अधिष्ठातांना दिला.
बैठकीला उपस्थित आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णालयातील विविध समस्यांमुळे रुग्ण कसे त्रस्त झाले आहेत, याबाबत माहिती दिली. मंत्री समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आमदारांचाही हिरमोड झाला.
तिवारींची अनुपस्थिती : गुरुवारपर्यंत प्रभारी अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले नेत्र विभागाचे डॉ. उमेशचंद्र तिवारी यांची बैठकीतील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
दवाखान्यात घाणीचे साम्राज्य

मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी दवाखान्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्रिमहोदयांनी अधिष्ठातांकडे पाहण्याच्या पलीकडे साधी विचारपूसही स्वच्छता यंत्रणेची केली नाही.
तुकाराम हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड
संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार मूर्तिजापूरचे आमदार हरीश िपंपळे यांनी केली. संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल सरकारी रुग्णालयाशी संलग्नित करा, नाही तर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल लवकर सुरू करायला पाहिजे, असा विचार मांडला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्नेकबाइट औषधही नसते...पालकमंत्री चिडले...