आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरातील बनावट उत्पादनांचा पर्दाफाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बनावट गुलालाचे उत्पादन करणार्‍या दोन कारखाने आणि गोदामांवर पोलिसांनी छापे टाकले. लदनिया कंपाऊंडमधील कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी गुलालाच्या 600 बॅग्ज (कट्टे) जप्त केल्या.
याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शफी अब्दुल रज्जाकला ताब्यात घेतले तसेच मासूम शहा दर्गारोडवरील कारखान्यावर छापा टाकून मोहम्मद मुश्ताक मोहम्मद मनसूरला ताब्यात घेतले. या ठिकाणी गुलालाच्या सुमारे 200 बॅग (कट्टे) जप्त केल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विडी, सिलिंडर जप्त, एका आरोपीला अटक
अकोला- खंगरपुर्‍यातील बनावट विडीच्या छोटेखानी कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. कच्ची विडी ही गोंदिया, चंद्रपूर येथून आणण्यात येत होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अनिस अब्दुल हबीबला (वय 47) अटक केली आहे. बनावट विडींची विक्री यात्रा आणि ग्रामीण भागात करण्यात येत होती. जप्त मुद्देमालाची किंमत 40 हजार रुपये आहे. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, एपीआय शिरीष खंडारे, हेड कॉन्स्टेबल सुरेश वाघ, जावेद खान, सुनील टोपकर, आशीष ठाकूर, नरेंद्र चर्‍हाटे, संजय भारसाकळ, गणेश पांडे, कैलास जांबरे यांनी केली.

तीन कारखान्यांवर छापे, पोलिसांची कारवाई
बनावट गुलाल आणि विडीचे उत्पादन करणार्‍या लक्कडगंज परिसरातील तीन कारखान्यांवर रामदासपेठ पोलिसांनी 11 सप्टेंबरला सायंकाळी छापे टाकले. या छाप्यात बनावट गुलालाच्या बॅग्ज (कट्टे) आणि विडीचे खोके जप्त केले. गुलालाचे छापे लदनिया कंपाऊंड व मासूम शहा दर्गारोडवर, तर खंगरपुर्‍यातील विडी कारखान्यावर छापे टाकण्यात आले. छाप्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकाच दिवशी तीन बनावट कारखान्यांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली.

हानिकारक गुलालाची विक्री
एका कट्टय़ामध्ये दहा किलो गुलाल आहे. 40 रुपये प्रती कट्टय़ाप्रमाणे विक्री केली जाते. हा गुलाल शरीराला हानिकारक आहे. या गुलालामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात तसेच गुलाल डोळ्यात गेल्यास मोठी इजाही होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


गुलालात निकृष्ट रंग
कारखान्यामध्ये दोन मोठे मिक्सर होते. या मिक्सरमध्ये मार्बलची भुकटी तयार करण्यात येते. या भुकटीपासून गुलाल तयार करण्यात येतो. या गुलालाची कमल गोल्ड या नावाने विक्री करण्यात येत होती.