आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांचे गौडबंगाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बनावटनोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या चार जणांना नुकतीच स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून विविध बँकांमध्ये नकली नोटा सापडत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ही टोळी सक्रिय असल्याच्या बाबीला दुजोरा मिळला आहे. मात्र, फेब्रुवारी २०१४ आणि आताच्या कारवाई व्यतिरिक्त पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे बँकांनी वेळोवेळी दिलेेल्या तक्रारीचा तपास चिखलात फसलेल्या हत्तीप्रमाणे होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यापूर्वी पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी दोन वेळा झालेल्या पोलिस कारवाईत डझनभर बालगुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली हाेती. दरम्यान, फेब्रुवारी २०१४ मध्ये वाशीम रस्त्यावरील एका बंगल्यात बनावट नोटा छापण्याचा उद्योग उघडकीस आला. त्यामुळे अकोल्यातूनही बाहेर राज्यात नोटा जात असल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. याव्यतिरिक्त शहरात इतर काही टोळ्या सक्रिय असून, त्यांना राजकीय आश्रय असल्याने त्यांचा गोरखधंदा दिवसेंदिवस फोफावत आहे. बँकेतील काही कर्मचाऱ्यांशी साटेलोटे करून, या नकली नोटा चलनात आणल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत बनावट नोटाप्रकरणी सिव्हिल लाइन्स रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असले, तरी एकाही गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिस लावू शकले नाहीत.
- नोटमध्ये "फ्लायरमार्क' असतो. त्याच्या मधोमध टाचणी टोचल्यास ती दुसऱ्या बाजूनेही छिद्र करते.
- खऱ्या नोटांच्या आकारातकधीच फरक पडत नाही. मात्र, खोट्या नोटांच्या आकारात अनेकदा तफावत दिसून येते.

खऱ्या नोटेत "लेटंट इमेज' तंत्रज्ञानाचावापर केला असल्याने ही नोट तिरकी धरल्यास नोटेचे मूल्य हिरव्या रंगात दिसते; तर हीच नोट सरळ धरल्यास हे मूल्य निळसर रंगात दिसते.
सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्रअसले तरी खऱ्या चलनात या चित्राबरोबरच नोटेवरील कोऱ्या जागेत गांधीजींची प्रतिमा असते. "वॉटरमार्क'च्या साहाय्याने उमटवण्यात आलेली ही प्रतिमा नोट जमिनीला समांतर धरून पाहिल्यास केवळ रेषाकार दिसते, तर तीच नोट प्रकाशाच्या दिशेने उभी धरल्यास त्यात गांधीजींचा संपूर्ण चेहरा दृष्टीस पडतो. खोट्या नोटेच्या बाबतीत असा प्रकार दिसून येत नाही.

सुरक्षा धागा हाखऱ्या नोटेवरील सर्वाधिक महत्त्वाचा भाग समजला जातो. १०० रुपये त्यापुढील मूल्यांच्या नोटेवर हा धागा एका बाजूने पाहिल्यास सरळ रेषेत, तर दुसऱ्या बाजूने खंडित स्वरूपात दिसतो.

चंद्रपूर बसस्थानकावरून अकोलायेथील अभिजित म्हैसूळकर (रा. अकोला) याला स्कॉर्पिओ गाडीसह नकली नोटाप्रकरणी अटक करण्यात आली होती. बनावट नोटा चलनातआणणाऱ्या अकोला येथील दोघांना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले होते. जवळच्या शेगाव येथे नकली नोटांचा वापर करणाऱ्या तीन युवकांना शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडले होते. ते अकोला येथून नोटा घेऊन जात होते.
भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यशाखेत हजार रुपयांच्या पाच नोटा, ५०० रुपयांच्या २४ नोटा, तसेच १०० रुपयांच्या चार नोटा नकली आढळून आल्याची तक्रार तत्कालीन मुख्य प्रबंधक सोनटक्के यांनी केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हासामान्य रुग्णालयाचा सफाई कर्मचारी असलेल्या दीपक पवार याच्या बंगल्यावर छापा टाकून चार लाख रुपयांच्या नकली नोटा ताब्यात घेतल्या होत्या.
स्टेट बँकेच्या रामदासपेठशाखेत नकली नोटा आढळल्याची तक्रार तत्कालीन शाखा प्रबंधक अब्बासी मोरबी यांनी दिली होती. याच दिवशी बँकेत कोणीतरी हजार रुपये जमा केले होते. त्यातील नोटा बनावट होत्या. त्यानंतर पश्चिम बंगालमधील युवकांना ताब्यात घेतले होते.
ग्राहकाच्या नोटांमध्ये अनावधानाने आलेल्या बनावट नोटांचा भुर्दंड ग्राहकाला देण्याचे सक्त आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेत. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नोटिफिकेशन क्रमांक RBI/2013-14/87 No.DCM (FNVD) G-5/16.01.05/2013-14 नुसार याबाबत स्पष्ट सूचना आहे. ग्राहक स्वत:हून रोख रकमेच्या गड्डीत बनावट नोट घालत नाहीत. अनवधानाने ती नोट निघते.
बातम्या आणखी आहेत...