आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • During The Interviews Was Confusion District Council

मुलाखतीदरम्यान झाला जिल्हा परिषदेत गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषदेंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत निर्मल भारत अभियान कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार्‍या पदभरती प्रक्रियेदरम्यान, मंगळवारी नियोजनाअभावी गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेमध्ये 4 फेब्रुवारीला पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन तसेच निर्मल भारत अभियानांतर्गत शिपाई पदाच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.
यापूर्वी 31 जानेवारीला याच विभागाच्या स्वच्छता तज्ज्ञ, मूल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ, पाणी गुणवत्ता समाजशास्त्रज्ञ, गटसमन्वयक, समूह समन्वयक, जलनिरीक्षक या पदांच्या मुलाखती झाल्या. शिपाई पदाच्या मुलाखती तांत्रिक अडचणीमुळे 4 फेब्रुवारीला घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सकाळी 11 वाजेनंतर वॉक इन इंटरव्हय़ू घेण्यात आले. प्रथम अर्जस्वीकृतीनंतर मुलाखती अशाप्रकारे प्रक्रिया झाली. शिपाई पदाच्या मुलाखतीकरिता आलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची बसण्यासाठी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला.
साहेबांचा भ्रमणध्वनी बंद
जिल्हा परिषदेत अशाप्रकारचा गोंधळ नेहमीच पाहायला मिळतो. यापूर्वीसुद्धा 31 जानेवारीला झालेल्या मुलाखतीदरम्यान गोंधळ झाला होता. बरेच उमेदवार मुलाखत न देताच निघून गेले होते. उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची, त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली दिसून येत नाही. जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्ररीत्या सभागृह उपलब्ध आहे. मात्र, त्याचा वापर का केला जात नाही,असा प्र्श यानिमित्ताने निर्माण होत आहे.
मुलाखत प्रकियेसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत कडुकार यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
नियोजनशून्य कारभार
फेब्रुवारीला नियोजित केल्यानुसार अंगणवाडी-बालवाडी कर्मचार्‍यांनी जि.प. सकाळी 11 वाजेपासून ठिय्या आंदोलन केले. 1,500 हून अधिक महिला एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या आवारात जमा झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. यात शिपाई पदाच्या मुलाखती बाजुलाच असलेल्या समाजकल्याण विभागात घेण्यात आल्या. या सर्व प्रकाराने उमेदवार चांगलेच गोंधळून गेले होते. 31 जानेवारीप्रमाणेच आजही उमेदवाराना हॉलमध्ये बसवण्यात जिल्हा परिषद प्रशासनाने दिरंगाई केल्याचे दिसून आले. याचा फटका मात्र शिपाईपदासाठी मुलाखत देण्याकरिता आलेल्या उमेदवारांना बसला.